'जितेंद्र आव्हाड ढोंगी, एक्टिंग करतो' राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाच्या आरोपाने खळबळ

सुधीर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे ग्राणीण युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख ढोंगी असा केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
ठाणे:

अमजद खान 

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्यांच्यात पक्षातील युवक जिल्हाध्यक्षाने गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुधीर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे ग्राणीण युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख ढोंगी असा केला आहे. शिवाय ते एक्टींग करतात. त्यांनीच जिल्ह्याची वाट लावली असा खळबळजनक आरोप केला आहे. सुधीर पाटील हे कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. तशी तयारी त्यांनी केली होती. मात्र हा मतदार संघ ठाकरे गटाला गेल्याने पाटील यांनी यासाठी आव्हाड यांना दोषी मानले आहे. शिवाय त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. आरोप केल्यानंतर त्यांनी पक्षाच्या राजीनामा ही दिला आहे. ते कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढणार आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ठाणे जिल्ह्यात शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचाऱ्यांच्या लोकांना न्याय मिळणार असे सांगितले जात होते. मात्र हे फक्त ढोंग होतं. हे ढोंग जितेंद्र आव्हाड करत आहे. ते फक्त अॅक्टींग करतात. त्यांनीच या जिल्ह्याची वाट लावली. अशा माणसाच्या विरोधात बोलायचं नाही तर काय करायचं. त्यांना पाडण्यासाठी मी स्वत: जाणार आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी केले आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून सुधीर पाटील ही इच्छुक होते. मात्र ही जागा ठाकरे गटकडे गेली. त्यानंतर पक्षात जितेंद्र आव्हाडा विरोधात प्रचंड नाराजी आहे. महाविकास आघाडीला कल्याण डोंबिवलीतील चारही जागांवर मदत न करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे असे यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - ठाकरे गटाची दुसरी यादी आली, काँग्रेसने दावा केलेल्या 'त्या' जागेवरही उमेदवाराची घोषणा

कल्याण डोंबिवलीतील चार जागांपैकी कमीत कमी दोन जागा महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मिळतील अशी आशा होता. त्यातली एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि एक जागा काँग्रेसला मिळेल असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र कल्याण डोंबिवलीतील चारही जागा ठाकरे गटाला गेल्या. कल्याण पूर्व विधानसभेसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुधीर पाटील यांनी आपली संपूर्ण ताकद लावली होती. मात्र ही जागा ठाकरे गटाला गेली. शिवाय धनंजय बोडारे यांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली.

ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसची दुसरी यादी आली, 'या' बड्या नेत्यांना पुन्हा संधी, तर वादग्रस्त जागांवरही उमेदवार

ही माहिती समोर येताच, राष्ट्रवादी शरद पवार गटात अस्वस्थता पसरली आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण युवक अध्यक्ष सुधीर पाटील यांनी तातडीने रात्री कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली गेली. त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली. सुधीर पाटील यांनी मंचावरून जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल खूप काही बोलून गेले. 

ट्रेंडिंग बातमी - लोकसभेतील मैत्री विधानसभेत तुटली! मुंबईतील जागांवरुन शिंदे-ठाकरे, आमने-सामने

आव्हाडांना राष्ट्रवादीच्याच मंचावरून ढोंगी संबोधलं गेलं. कल्याण डोंबिवलीत कार्यकर्ते आम्ही मनापासून तयार केले. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी संपूर्ण जिल्ह्याची वाट लावली. दरम्यान सुधीर पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  29 तारखेला ते कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तशी त्यांनी घोषणा केली आहे. एवढेच नाही तर कल्याण डोंबिवलीतील चारही विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीला मदत न करण्याचा निर्धार ही केला आहे.