'तो' प्रश्न आणि सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात टचकन पाणी! नेमकं काय घडलं?

जाहिरात
Read Time: 2 mins
Sunetra Pawar सुनेत्रा पवार भावनिक झाल्या होत्या
मुंबई:


बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला रंगत आता वाढू लागलीय. या निवडणुकी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. त्यानिमित्तानं दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधात टोलेबाजी सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी 'पवार कार्ड' चा वापर करत सुनेला निवडून द्या असं आवाहन केलं होतं. त्यावर शरद पवारांनी सुनेत्रा या बाहेरच्या पवार आहेत, असा इशारा केला होता. या प्रकरणावर आता सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शरद पवार यांनी तुम्हाला 'बाहेरचे पवार' म्हंटले त्यावर सुनेत्रा यांनी प्रतिक्रिया विचारण्यात आला होता. त्यावेळी सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या चांगल्याच भावनिक झाल्या आणि काहीही उत्तर न देता निघून गेल्या. ANI या वृत्तसंस्थेनं हा व्हिडिओ शेअर केला आहे.

काय आहे वाद?

'बारामतीची जनता नेहमी पवार आडनावाच्या मागे उभी राहते. 1991 साली तुम्ही मुलगा म्हणून मला खासदारकीला निवडून दिले. त्यानंतर वडिलांना म्हणजेच साहेबांना निवडले. त्यानंतर तीन वेळा लेकीला निवडून दिले. आता सुनेला निवडून दिले की फिट्टामफाट होईल.' असं सांगत अजित पवारांनी बारामतीमध्ये 'पवार कार्ड' वापरले होते. अजित पवारांच्या या डावपेचाला शरद पवारांनी उत्तर दिलं.

'एकीकडे लढण्याचे नाटक, दुसरीकडे बिनशर्त पाठींबा' राज यांना उद्धव यांनी डिवचले
 

पवारांनी काय दिलं उत्तर?

अजित पवारांच्या या वक्तव्यावर पुण्यात गुरुवारी (12 एप्रिल) रोजी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. अजित पवार यांच्या बोलण्यात काय चूक आहे? बारामतीची जनता नेहमी पवारांच्याच मागं उभी राहते. मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार..' असं शरद पवार म्हणाले होते. सुप्रिया सुळे या मूळ पवार आहेत. तर सुनेत्रा पवार या लग्नानंतर पवार झाल्याचं सांगत त्या बाहेरच्या आहेत हेच पवार यांनी यामधून सुचवलं असल्याचं मानलं जात आहे. 

Advertisement