बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी प्रतिज्ञापत्र देखील सादर केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती यातून समोर आली आहे. सुनेत्रा पवार या चल-अचल अशा जवळपास 71 कोटींच्या मालकीण आहेत.
सुनेत्रा पवार यांच्याकडे 12 कोटी 56 लाख 58 हजारांची जंगम तर 58 कोटी 39 लाख 40 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये शेतजमीन, बिगर शेतीची जमीन, दागिने, गुंतवणूक यांचा समावेश आहे. सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीशी तुलना केली तर सुनेत्रा पवार यांच्याकडे अधिकची संपत्ती असल्याचं दिसून येतंय. सुप्रिया सुळे यांच्याकडे चल-अचल अशी एकूण जवळपास 48 कोटींची संपत्ती आहे.
कोट्यवधींचे दागिने, शेतजमीन, FD, शेअर्स... सुप्रिया सुळेंची एकूण संपत्ती किती?
पती, सासू, नणंद यांना कर्ज
सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना कर्ज देखील दिलं आहे. प्रतिभा पवार यांना त्यांनी 50 लाख, अजित पवार यांना 63 लाख, तर सुप्रिया सुळे यांना 35 लाखांचं कर्ज दिल्याची माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.
पवारांनी सुप्रिया सुळेंना उमेदवारी द्यायला नको होती, रामदास आठवलेंची स्पष्टोक्ती
सुनेत्रा पवार यांची एकूण संपत्ती
एकूण 2 कोटींचं कर्ज वाटप
प्रतिभा पवार - 50 लाख कर्ज
अजित पवार - 63 लाख कर्ज
सुप्रिया सुळे - 35 लाख कर्ज
बँकेतील ठेवी - 2 कोटी 97 लाख
शेअर्समधील गुंतवणूक - 15 लाख 89 हजार
ट्रॅक्टर आणि २ ट्रेलर - 10 लाख 70 हजार
चांदी 35 किलो (भांडी) - 24 लाख 99 हजार
सोन्याचे दागिने - 1 किलो 30 ग्रॅम (51 लाख 84 हजार)
हिऱ्यांचे दागिने - 24 लाख
अचल मालमत्ता- 8 कोटी 39 लाख 40 हजार
स्थावर मालमत्ता - 12 कोटी 56 लाख 58 हजार