नाद करायचा नाय! पवार मुंडेंना दाखवून देणार, करेक्ट कार्यक्रमासाठी करेक्ट उमेदवार?

धनंजय मुंडेंच्या होमपिचवर त्यांना आस्मान दाखवण्यासाठी शरद पवारांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
बीड:

स्वानंद पाटील

सर्वांचा नाद करायचा पण पवार साहेबाचा नाद करायचा नाही. हा डायलॉग अनेक वेळा धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात मारला आहे. विरोधकांनाही ते याच डायलॉगच्या माध्यमातून डिवचत होते. पण आता हाच डायलॉग खरा करून दाखवण्यासाठी खुद्द शरद पवारच सरसावले आहेत. धनंजय मुंडेंच्या होमपिचवर त्यांना आस्मान दाखवण्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. त्यासाठी त्यांनी असे उमेदवार शोधले आहेत की त्यामुळे मुंडेंना करेक्ट कार्यक्रमच होतो की काय अशी चर्चा मतदार संघात सुरू झाली आहे.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

परळी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार पङक्षाकडून सुनील गुट्टे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सुनील गुट्टे यांची पाटी कोरी आहे. स्वच्छ प्रतिमा आणि उच्च शिक्षित ही त्यांची जमेची बाजू आहे. वडील रत्नाकर गुट्टे हे गंगाखेडचे आमदार आहेत. तर आई सुधामती गुट्टे या शरद पवारांच्या कट्टर समर्थक राहील्या आहेत. पक्ष फुटीनंतर त्यांनी शरद पवारांनाच साथ दिली. गुट्टे कुटुंबाचा परळीत चांगला दबदबा आहे. निवडणूक लढण्या आधी सुनील गुट्टेकर हे मतदार संघात चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यांनी शेतकरी संवाद यात्राही काढली होती. त्यातून संपुर्ण मतदार संघ त्यांनी पिंजून काढला आहे. तरूण चेहरा मैदानात उतरवून पवारांनी मुंडेंना शह देण्याची रणनिती आखली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - लढणार की पाडणार? जरांगेंचं ठरलं? मोठ्या निर्णयाच्या तयारीत मराठा समाज

त्यामुळे सुनील गुट्टे हे ही  धनंजय मुंडे यांच्या विरोधात मतदार संघात आक्रमक झाले आहे. मुंडे यांनी 2019 च्या वचन नाम्यातील शब्द पाच वर्षात पाळले नाही असा आरोप ते प्रत्येक ठिकाणी करत आहेत. मुंडेंनी मंत्री पदाचा फायदा फक्त वैयक्तिक लाभासाठी करून घेतला. त्याचा फायदा शेतकऱ्यांना काही झाला नाही असेही ते सांगत आहेत. धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झालेत, असा थेट आरोप करत त्यांनी धनंजय मुंडे यांना थेट आव्हान दिलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - महायुती सरकारला दणका! निवडणूक आयोगाने 'ते' निर्णय केले रद्द, महामंडळाच्या नियुक्त्यांवरही गाज

धनंजय मुंडेंचा वचननामा फेल झाला आहे. परळी विधानसभा मतदारसंघात शेतकरी, बेरोजगार, विद्यार्थी, महिला यांचे प्रश्न तसेच्या तसेच आहेत. लोकांचा विकास झालेलाच नाही. मूलभूत प्रश्न ही तसेच आहेत. मतदारसंघात फक्त मोठी दादागिरी आहे. त्यामुळेच की काय इथल्या सर्व लोकांना 354 चे कलम परिचयाचे झाले आहे. कोणालाही याबाबत विचारले तर ते जाहीर पणे सांगत असतात. सध्याच्या स्थितीत परळी मतदारसंघांमध्ये मोठी दहशत आहे. शिवाय धनंजय मुंडे यांनी 2019 च्या वचननाम्यातील किती वचनं पुर्ण केली हे सांगावे असे आव्हानही त्यांनी दिले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मविआत फूट? 'ते' दोन पक्ष बाहेर पडणार? एकाने उमेदवार जाहीर केला तर दुसऱ्याने थेट...

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचा प्रचार सुरू केला आहे. मात्र त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी शरद पवारांनी केली आहे. धनंजय मुंडे यांच्या सोबतीला यावेळी आमदार पंकजा मुंडेही असणार आहेत. त्यामुळे या भाऊ बहीणीला टक्कर देणारी ताकद शरद पवार मतदार संघात उभी करत आहेत. लोकसभेला हे दोघे भाऊ बहीण एकत्र असतानाही त्यांना पराभवाला समोरे जावे लागले होते. त्यामुळे सुनील गुट्टे यांनी ही जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंडे यांच्या विरोधात माहोल बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवाय मराठा आंदोलनाचा परिणामही या मतदार संघात होवू शकतो.