विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर, आयोगाचा मोठा निर्णय

जून महिन्यात होणारी विधानपरिषदेची निवडणूक पुढं ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Vidhan Parishad Election :  जून महिन्यात होणारी विधानपरिषदेची निवडणूक पुढं ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार होते. त्यानंतर सात दिवसांच्या आतच म्हणजे 10 जून रोजी चार जागांसाठी या निवडणुका होणार होत्या. दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघात या निवडणुका होणार होत्या. पण, आता या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयोगानं जाहीर केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या चारही जागांची मुदत 7 जुलै 2024 ला संपत आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलैला संपत आहे. तर मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे.

( नक्की वाचा : राहुल गांधींशी चर्चा करण्यासाठी भाजपानं 'या' नेत्याचं नाव केलं निश्चित )

या निवडणुकींचं नोटिफिकेशन 15 मे रोजी निघणार होतं.  22 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. तर अर्ज मागे घेण्यासाठी 27 मे पर्यंत आयोगानं मुदत दिली होती.  10 जूनला सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार होतं. पण हे नोटिफिकेशन निघण्याच्या एक दिवस आगोदरच आयोगानं ही निवडणूक पुढं ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे.