निवडणूक महाराष्ट्राची पण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा का?

रेवंत रेड्डी यांनी मुंबईतही आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघात रोड शो केला होता. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता.

जाहिरात
Read Time: 3 mins
नांदेड:

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे. प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. शिवाय केंद्रीय नेतेही प्रचारासाठी महाराष्ट्रात दाखल झाले आहे. काही राज्यांचे मुख्यमंत्रीही प्रचारात सहभागी झाले आहेत. पण यात जर कोणाची चर्चा होत असेल तर ती तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची आहे. रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाच्या सीमेवरील जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उडवला आहे. शिवाय त्यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांना हैराण केले आहे. मुंबईतही आदित्य ठाकरेंसाठी याच रेवंत रेड्डी याचा रोड शो झाला होता. त्यांच्या हिंदी भाषणांना सीमेवरील जिल्ह्यात मोठा प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या निवडणुकीत रेवंत रेड्डींची चर्चा सर्वात जास्त होत आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यात रेवंत रेड्डी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. त्यांनी अशोक चव्हाण यांची मुलगी असलेल्या भोकर विधानसभेत प्रचाराचा धडाका लावला आहे. इथं काँग्रेसचे पप्पू पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. यावेळी रेवंत रेड्डी यांनी अशोक चव्हाण यांना लक्ष्य केलं आहे. अशोक चव्हाणांनी मेहनतीने पैसे कमवले नाहीत. त्यांनी भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा आता बाहेर काढले आहेत. असा आरोप रेवंत रेड्डी यांनी केला आहे. ते पैसे वाटतली. तर ते तुम्ही घ्या. अजिबात नाकारू नका. पैसे घ्या पण मत काँग्रेसला द्या असा सल्लाही त्यांनी मतदारांना दिला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'सगळ्यांचा नाद करायचा पण...' शरद पवारांचं धमाकेदार भाषण

भोकर मतदार संघातून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढत आहे. रेड्डी यांनी केलेल्या टीकेमुळे चव्हाण दुखावले गेले आहेत. रेवंत रेड्डींकडून पक्ष निष्ठेचे धडे घेण्याची मला गरज नाही. आरएसएस ,तेलुगू देसमला दगा देऊन ते काँगेस मध्ये आले आहेत असं अशोक चव्हाण म्हणाले. रेवंत रेड्डी यांचा इतिहास नांदेडच्या जनतेला माहित आहे. मलाही त्यांचा इतिहास माहित आहे. त्यामुळे त्यांनी मला निष्ठेचे धडे देण्याची गरज नाही असं ही ते म्हणाले. त्यानीच तेलगू देसम आणि आरएसएसला दगा दिला आहे असंही ते म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी - पुढचा मुख्यमंत्री कोण? थेट नाव सांगितलं, शिंदेंचा शिलेदार शेवटी बोललाच

आम्ही पैश्याच्या जोरावर निवडणूक लढवत नाही. काँग्रेस मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करत आहे. काँग्रेससाठी तेलंगणातून पैसा येत आहे असा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला. भोकरमध्ये पैश्यांच्या जोरावर अशोक चव्हाण निवडणूक लढवत असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले होते. त्यांना अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले आहे. मात्र कर्नाटक आणि तेलंगातून मोठ्या प्रमाणात काँग्रेससाठी पैसे आले आहेत असंही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - प्रियांका गांधींनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमधलं साम्य, पाहा VIDEO

रेवंत रेड्डी यांनी मुंबईतही आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघात रोड शो केला होता. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. मुंबईत तेलगू भाषिक मोठ्या प्रमाणात राहातात. शिवाय तेलंगणाच्या सीमेवरही तेलगू भाषिकांचा प्रभाव आहे. त्यामुळे रेवंत रेड्डी हा परिसर पिंजून काढत आहेत. काँग्रेस उमेदवारांसाठी ते प्रचार सभा घेत आहेत. त्यातून त्यांनी केलेल्या आरोपांची चर्चा सध्या राजकीय वर्तूळात होत आहे. पण त्यांनी या निवडणूकीत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.