Maharashtra Election कोण जिंकणार ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई? Exit Poll चे सर्व आकडे वाचा एका क्लिकवर

Maharashtra Election 2026 : ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या तीन महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Maharashtra Election 2026 : मुंबईच्या वेशीवरील या 3 महत्त्वाच्या महापालिकेवर महायुतीचे वर्चस्व राहण्याचा अंदाज आहे.
मुंबई:

Maharashtra Election 2026 : ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या तीन महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकांचे मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून, यामध्ये सत्ताधारी महायुतीचे पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे. साम टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलनुसार, मुंबईच्या वेशीवर असलेल्या या तिन्ही शहरांमध्ये भाजपा आणि शिवसेना या महायुतीमधील पक्षांनी मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

कल्याण डोंबिवलीत  एकनाथ शिंदे यांची जादू

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे  वर्चस्व राहण्याची दाट शक्यता आहे. या महापालिकेत शिवसेमै सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग आणि राडे पाहायला मिळाले होते, मात्र त्याचा मोठा परिणाम या एक्झिट पोलमध्ये दिसत नाही.


( नक्की वाचा : BMC Election Result Exit Poll : बीएमसीचा 'किंग' कोण? भाजपची मुसंडी की ठाकरेंचा गड कायम; पाहा एक्झिट पोलचे आकडे )

कल्याण डोंबिवलीचे पक्षनिहाय बलाबल (KDMC Election 2026 Exit Poll Result Update)

कल्याण डोंबिवलीतील एकूण 122 जागांपैकी शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भारतीय जनता पार्टीला 42 जागा मिळतील, असे हा पोल सांगतो. राज ठाकरे यांच्या मनसेला 06 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT), काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी या सर्वांना प्रत्येकी केवळ 02 जागांवर समाधान मानावे लागू शकते. अपक्ष आणि इतर उमेदवारांच्या पदरात 06 जागा पडतील असा अंदाज आहे.

Advertisement

( नक्की वाचा : PMC Election Result Exit Poll : भाजपा विरुद्ध अजित पवार लढाईत पुण्याचा कारभारी कोण? वाचा एक्झिट पोलचा अंदाज )

ठाण्यात एकनाथ शिंदेंचे स्पष्ट बहुमत ( TMC Election 2026 Exit Poll Result Update )

मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली पकड अधिक मजबूत केल्याचे दिसत आहे. एकूण 131 वॉर्डांपैकी एकट्या शिंदे गटाला 72 वॉर्डांत विजय मिळण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे त्यांना या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. 

भाजपला येथे 26 वॉर्डांवर यश मिळण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षात शरद पवार गटाची राष्ट्रवादी 15 वॉर्डांसह तिसऱ्या क्रमांकावर राहू शकते. अजित पवार गटाला 10, काँग्रेसला 3, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 3 आणि मनसेला 2 वॉर्ड मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Advertisement

नवी मुंबईत भाजपचा झेंडा  ( Navi Mumbai Election 2026 Exit Poll Result Update )

नवी मुंबई महानगरपालिकेत मात्र भाजपने एकतर्फी वर्चस्व राखल्याचे चित्र आहे. एकूण 111 वॉर्डांपैकी भाजपने तब्बल 64 वॉर्ड जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 40 वॉर्ड मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित पक्षांची अवस्था नवी मुंबईत अत्यंत बिकट दिसत असून, उद्धव ठाकरे गटाला 4, तर मनसे, अजित पवार गट आणि शरद पवार गट यांना प्रत्येकी केवळ 1 वॉर्ड मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसला खातेही उघडता येणार नाही, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.