लोहा कंधार विधानसभा मतदार संघात उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधी उमेदवारा विरोधात उद्धव ठाकरेच्या शिवसैनिकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. त्याच शिवसैनिकाला पकडून त्याची बोट छाटण्याचा प्रकार लोहा कंधारमध्ये घडला आहे. झालेल्या प्रकाराबाबत उद्धव ठाकरे यांनी भर सभेत संताप व्यक्त केला. शिवाय ज्या शिवसैनिकाची बोटे छाटली त्याला स्टेजवर बोलावरून त्याच्या पाठीवर थाप मारली. घाबरू नकोस सर्वांचा हिशोब करणार असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला. त्यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभेचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. त्यातच सोशल मीडियावरहील वातावरणही तापलं आहे. लोह कंधारमध्येही एक पोस्ट विरोधकांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसैनिकांनी टाकली होती. त्याची शिक्षा म्हणून त्याची बोट छाटण्यात आली. याबाबत उद्धव ठाकरेंनी भर सभेत उल्लेख केला. शिवसैनिकाच्या हाताला काय झालं? गद्दारांनी बोट छाटली. आता मनात आणलं तर या गद्दारांना जागेवर नाही ठेवणार. मुळा सकट उपटून टाकीन या गद्दारांना असा दमच भर सभेत उद्धव ठाकरे यांनी भरला.
ट्रेंडिंग बातमी - 'मोदींना महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवली' पवारांनी तोफ डागली
जर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था असेल असं सांगात असाल तर माझ्या शिवसैनिकाची ज्याने बोटं छाटली त्याच्यावर कारवाई करा. कारवाई नाही केली तर पोलिसांना बाजूला ठेवा, बघतो कोण अंगावर चालून येतोय. जर शिवसैनिकांच्या केसाला जर धक्का लावला तर ते हात जागेवर राहाणार नाहीत. पोलिसांनीही हे लक्षात ठेवावे असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही षंड आहोत असे नाही असेही ते म्हणाले. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे.वार करायचा नाही. पण जर कोणी वार केला तर ते हात जागेवर ठेवायचे नाहीत. हीच शिकवण आम्ही पुढे घेवून जात आहेत.
ट्रेंडिंग बातमी - 'महाराष्ट्राला काँग्रेसचं ATM करु नका,' पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन
ज्या शिवसैनिकाची बोटं छाटण्यात आली त्याला उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर बोलवलं. त्यानंतर त्याच्या पाठीवर हात मारत त्याला शाब्बासकी दिली. शिवाय काळजी करू नकोस. प्रत्येकाचा हिशोब होणार. ज्याने हल्ला केला त्याला सोडणार नाही असे त्यांनी सांगत, विरोधकांनी थेट इशाराही दिला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत गद्दारांना गाडण्याचे वचन उद्धव ठाकरे यांना दिले. जर लढायचे असेल तर मर्दा सारखे लढा असे आव्हान ठाकरेंनी दिले.
तुम्हा तिघांना हा महाराष्ट्र 23 तारखेनंतर तडीपार करणार आहे. तुम्हाला गेट आऊट करणार आहे. राज्यात सत्ता आमच्याकडे असणार आहे. पोलिसही आमच्या ताब्यात असतील. सर्व यंत्रणा आमच्या हातात असतील. या यंत्रणा जर तुमच्या मागे लागल्या ना तर सुरतला पण पळता येणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. तुमचे सर्व रस्ते बंद करून टाकीन असा दमही उद्धव ठाकरे यांनी दिला.