शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरनंतर कोकणात प्रचार सभा घेतली. यावेळी सामंत आणि राणे कुटुंबाच्या घराणेशाहीवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. शिवाय शिवसेना ही माझीच आहे. मी निवडणूक आयोगाचा निर्णय मानत नाही. असे ठणकावून सांगितले. शिवाय अटल बिहारींची भाजप आता राहीली नाही. ती पोखरली गेली आहे. सत्तेसाठी पक्ष आणि घरं फोडली जात आहेत. भाजपला उद्धव ठाकरे चालत नाही. कारण त्यांना मी भिडत होतो, असे बोलत त्यांनी कोकण गुंडाच्या हातात देणार आहात का? असा प्रश्न कोकणवासीयांना केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना ही माझीच आहे. ती माझ्याकडेच आहे. मी निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करणार नाही. मी शिवसेना हेच नाव वापरणार. शिवसेना कोणाची याची सुनावणी 8 तारखेला होणार आहे. सुनावणी करा ती बतावणी नको. आम्हाला न्याय द्या असे आवाहन त्यांनी कोर्टाला केले. आता सुनावणी नको आता निकाला द्या असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान काही जण पैशांनी महाराष्ट्र विकत घेण्याचे पाहात आहेत. पण पैशांनी महाराष्ट्र विकला जावू शकत नाही. जिद्द, लढाऊपण राज्याचा आहे. असे ते म्हणाले. त्यामुळे मुंबई पासून अगदी कोकणाच्या शेवटच्या टोकपर्यंत सर्व गद्दारांना गाडून टाका असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.
ट्रेंडिंग बातमी - जरांगे यांनी उमेदवार का दिले नाहीत? आदल्या रात्री पडद्यामागे काय घडलं?
रत्नागिरीतही जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी उदय सामंत आणि राणेंवर जोरदार टिका केली. जे लोक आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करतात. ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बद्दल काय बोलणार आहे. रत्नागिरीत दोघे भाऊ खात आहेत. तर सिंधुदुर्गात बाप- भाऊ भाऊ खात आहेत. मग कोकणातल्या सर्व सामान्य माणसाने काय करायचं. सध्या मशालीची धगधग सर्वत्र दिसत आहे. ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहात होता. तो क्षण आता आला आहे. मुंबई पासून कोकणापर्यंत ही मशालीची धग दिसली पाहीजे. कोकणाच्या अस्तित्वाची ही निवडणूक आहे. त्यामुळे हे कोकण गुंडांच्या हातात द्यायचे का असा प्रश्न त्यांनी केला. जे गुर्मीत आहेत. जे गद्दार आहेत. त्यांना या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केला.
ट्रेंडिंग बातमी - पहिल्याच सभेत उद्धव ठाकरेंच्या 3 मोठ्या घोषणा, विरोधकांवरही तुटून पडले
उदय सामंत यांना उमेदवारी दिली हे माझं पाप होतं. मीच त्यांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता. 2014 ला ते शक्य झालं नाही. पण 2019 साली सरकार आल्यावर मीच त्यांना मंत्री केलं होतं. पण त्यांनी पाठित खंजीर खूपसला. त्याचं मानेवर बसलेले भूत आता मानेवरून उतरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रत्नागिरीतून बाळा माने यांना विजय करण्याचे आवाहन त्यांनी केलं. तर राजापूरमधून राजन साळवींना विजयी करण्याचे आवाहन केले. सिंधुदुर्गातील तीन ही मतदार संघात जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान बारसू रिफयनरी रद्द करणार असल्याचे आश्वास उद्धव ठाकरे यांनी दिले.