लोकसभा निवडणुकी वेळी सातारा लोकसभा मतदार संघात जे घडलं तेच आंबेगाव विधानसभा मतदार संघातही घडलं आहे. तुतारी आणि पिपाणीच्या घोळात आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील हे अगदी काठावर विजयी झाले. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदार देवदत्त निकम यांचा अवघ्या 1500 मतांनी पराभव केला. तर पिपाणी चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला 2900 मतं मिळाली. विशेष म्हणजे त्या उमेदवाराचे नावही देवदत्त निकम होते. याचा फायदा दिलीप वळसे पाटील यांना झाला. देवदत्त निकम यांच्या हातातोंडाशी आलेला घास निघून गेला अशीच चर्चा आता मतदार संघात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आंबेगाव विधानसभेची निवडणूक चुरशीची लढवली गेली. या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप वळसे पाटील तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवदत्त निकम मैदानात होते. शेवटच्या फेरीपर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नव्हते. एकदा पारडं वळसे पाटलांकडे तर कधी देवदत्त निकम यांच्याकडे पारडं झुकत होतं. शेवटी वळसे पाटील यांनी 1500 मतांनी विजय मिळवला.
वळसे पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरताना आपले विरोधक असलेल्या देवदत्त निकम यांच्याच नावाचा आणखी एक व्यक्ती मैदानात उतरवला होता. शिवाय त्याला मिळालेलं चिन्ही ही तुतारी चिन्हा सारखं दिसणारं ट्रॅपेट होतं. त्यामुळे मतदार ही थोडे गडबडले होते. त्यामुळे ट्रॅपेट या चिन्हाला 2900 पेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. त्यामुळे इथेच सर्व खेळ झाला. एक तर एक सारखं नाव. दुसरं म्हणजे चिन्ह ही त्याच प्रमाणे दिसणारं. या मुळे निकम यांच्या हातातोंडाशी आलेला खास हिरावला गेल्याची भावना आहे. जर सारख्या नावाचं व्यक्ती रिंगणात नसता तर कदाचित या मतदार संघातला निकाल वेगळा लागला असता.
ट्रेंडिंग बातमी - देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर
सातारा लोकसभा मतदार संघातही अशी पद्धतीचा खेळ झाला होता. या मतदार संघातही पिपाणी चिन्हा होतं. त्या उमेदवाराला जवळपास 33,000 हजार मतं होती. त्याच वेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना मात्र 25,000 हजार मतांच्या फरकाने पराभव स्विकारावा लागला होता. तसाच काहीसा प्रकार आता आंबेगाव विधानसभा मतदार संघात घडला आहे. वळसे पाटील यांना निसटता का होई ना विजय मिळाला आहे. त्यासाठी त्यांच्या मदतीला नाव साधर्म्य आणि चिन्हा साधर्म्य या गोष्टी पथ्थ्यावर पडल्या.