Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार याचे उत्तर आज मिळणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान झाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. महाराष्ट्रात यंदा 66.05 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गेल्या 30 वर्षांतील मतदानाची ही सर्वाधिक नोंद आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये 61.1 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी या प्रमुख आघाड्यांमध्ये प्रामुख्याने लढत होताना दिसत आहे. भाजप BJP, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी एकत्र येत महायुती स्थापन केली आहे. काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. वंचित बहुजन आघाडीने आणि राज ठाकरेंच्या मनसेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू , राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती या आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीला तिसरी आघाडी म्हणून संबोधले जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे.
Here are the LIVE UPDATES on Maharashtra Election Results | महाराष्ट्र निवडणूक निकाल:
मावळ मतदारसंघात सुनिल शेळके आघाडीवर
मावळ मतदारसंघामध्ये सहाव्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार सुनिल शेळके आघाडीवर
Election Results 2024 Live:
येवला मतदारसंघात छगन भुजबळ 86 मतांनी आघाडीवर
मुंबादेवी मतदारसंघातून अमिन पटेल आघाडीवर, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एन.सी. पिछाडीवर
इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील चौथ्या फेरी अखेरीस 3124 मतांनी आघाडीवर
पुणे : चौथी फेरी - वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे 8,000 मतांनी आघाडीवर
Junnar Election Results Live:
जुन्नर विधानसभा : तिसऱ्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार शरद सोनवणे 3074 मतांनी आघाडीवर
Maharashtra Assembly Election Live:
तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघ -
दुसरी फेरी - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित आर आर पाटील 2050 मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Live:
- माण-खटावमधून भाजपचे जयकुमार गोरे 3400 मतांनी आघाडीवर
- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रभाकर घार्गे पिछाडीवर
Election Results 2024 Live:
सांगोला मतदार संघात शेकाप उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख आघाडीवर
Assembly Election Results LIVE: भिवंडीमध्ये काय आहे परिस्थिती?
भिवंडी पश्चिम
पहिली फेरीत
भाजपाचे महेश चौगुले आघाडीवर
महेश चौघुले - 4764
विलास पाटील - 1368
महेश चौघुले 3396 मतांनी आघाडीवर
भिवंडी ग्रामीण
तिसरी फेरी
शिवसेनेचे (शिंदे गट) शांताराम मोरे आघाडीवर
शिवसेनेचे (उबाठा) महादेव घाटाळ 4753
शिवसेनेचे (शिंदे गट) शांताराम मोरे 9531
Maharashtra Election 2024 Live: अंबरनाथ मतदारसंघ - पहिली फेरी
- डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना शिंदे - 4219 मते
- राजेश देवेंद्र वानखेडे, शिवसेना उबाठा - 2471 मते
पहिल्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे बालाजी किणीकर 1748 मतांनी आघाडीवर
Election Results 2024 Live:
मुरबाड : दुसऱ्या फेरीअखेर भाजपाचे किसन कथोरे यांना 8763 मतांची आघाडी
Maharashtra Assembly Election Live: भाजप ठाकरेंना पुन्हा सोबत घेणार? चंद्रकांत पाटलांचे मोठे संकेत
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 LIVE: भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील आघाडीवर
दुस-या फेरीमध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील 4,896 मतांनी आघाडीवर, काँग्रेसच्या प्रभावती घोगरे पिछाडीवर.
Maharashtra Election Results Live 2024:
शहादा मतदारसंघात तिसऱ्या फेरीत भाजपचे राजेश पाडवी 700 मतांनी आघाडीवर
NDA vs MVA
माजलगाव येथे पहिल्या फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके 450 मतांनी आघाडीवर
Assembly Election Results Live: दुसऱ्या फेरी अखेर धनंजय मुंडे आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे दुसऱ्या फेरी अखेर 4300 मतांनी आघाडीवर
Hingoli Assembly Election Results Live:
हिंगोली : EVMच्या पहिल्या फेरीत कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदेंच्या सेनेचे उमेदवार संतोष बांगर 2711 मतांनी आघाडीवर
Maharashtra Election Results: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गेवराईचे विजयसिंह पंडित 672 मतांनी आघाडीवर
Maharashtra Election Results Live: सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने गाठली शंभरी
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: एकनाथ शिंदे आघाडीवर
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे आघाडीवर
Maharashtra Election 2024: महायुती पुन्हा सत्तेत येईल - संजय निरुपम, उमेदवार, शिवसेना (शिंदे गट)
#WATCH | Mumbai: On couting for #MaharashtraElection2024, Shiv Sena candidate from Dindoshi Assembly constituency, Sanjay Nirupam says, "This election is very important. I have come here to seek the blessings of Shree Siddhivinayak. Mahayuti Govt will come back to power. It is… pic.twitter.com/BYUFUPLgzz
— ANI (@ANI) November 23, 2024
Election Results Live Updates:
आष्टी मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार सुरेश धस 400 मतांनी आघाडीवर
Beed Vidhan Sabha Election Live:
बीड विधानसभा राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर आघाडीवर
Election Results 2024 Live Updates:
केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे 576 मतांनी आघाडीवर
तुळजापूर : भाजपचे राणा जगजितसिंह पाटील आघाडीवर
- उमरगा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले टपाली मतमोजणीमध्ये आघाडीवर
- तुळजापूर मतदारसंघात महायुती भाजपचे राणा जगजितसिंह पाटील आघाडीवर
- धाराशिवमध्ये महाविकास आघाडी शिवसेना शिंदे गटाचे कैलास पाटील आघाडीवर
- परांडा येथे टपली मतदानात महायुती तानाजी सावंत आघाडीवर
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: परळीमधून धनंजय मुंडे आघाडीवर
- परळीमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे आघाडीवर
- रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेना(शिंदे गट) उमेदवार उदय सामंत आघाडीवर
- माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे अमित ठाकरे आघाडीवर
- कर्मत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे रोहित पवार आघाडीवर
माण खटाव मतदारसंघात पोस्टल मतदानामध्ये भाजपचे जयकुमार गोरे 803 मतांनी आघाडीवर
भाजपचे उमेश यावलकर आघाडीवर
अमरावती : मेळघाट विधानसभा मतदार संघातून प्रहारचे राजकुमार पटेल पोस्टल मतदानात आघाडीवर
मोर्शी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेश यावलकर आघाडीवर
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: NCPचे अण्णा बनसोडे आघाडीवर
पिंपरी विधानसभा : पिंपरी विधानसभा अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे 4300 मतांनी आघडीवर, शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत धर पिछाडीवर
उद्धव ठाकरे सोबत आले तर स्वागत - भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान
उद्धव ठाकरे सोबत आले तर स्वागत. आमच्या केंद्रीय नेतृत्वाचं मन मोठं आहे. उद्धव ठाकरेंना पश्चाताप झाला असेल तर सोबत घेऊ. ठाकरे महायुतीत येऊ शकतात.
Sharad Pawar: कागलमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे समरजित घाटगे आघाडीवर
- सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) माणिकराव कोकाटे आघाडीवर
- शिंदखेडा मतदारसंघात भाजपचे जयकुमार रावल आघाडीवर
- आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) दिलीप वळसे पाटील आघाडीवर
- बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे (शिंदे गट) राजेंद्र राऊत आघाडीवर
- जालन्यातील घनसावंगी मतदारसंघातून शरद पवार गटाचे राजेश टोपे आघाडीवर, शिंदेंच्या शिवसेनेचे हिकमत उढाण पिछाडीवर
- जालना मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गटः अर्जुन खोतकर आघाडीवर
- भोकरदनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे आघाडीवर
- बदनापूरमध्ये भाजपचे नारायण कुचे आघाडीवर
- कागलमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे समरजित घाटगे आघाडीवर
- इगतपुरीत पोस्टल मतदानात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे हिरामण खोसकर आघाडीवर
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: छगन भुजबळ आघाडीवर
- येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार छगन भुजबळ आघाडीवर
- मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) उमेदवार दादा भुसे आघाडीवर
Election Results 2024 LIVE Updates:
इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील आघाडीवर
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: औरंगाबादमध्ये कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? पाहा
- औरंगाबाद पूर्वमधून भाजपचे अतुल सावे आघाडीवर
- औरंगाबाद पश्चिममधून शिंदे शिवसेनेचे संजय शिरसाट आघाडीवर
- औरंगाबाद मध्यमधून शिंदे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल आघाडीवर
- सिल्लोडमधून शिंदे शिवसेनेचे अब्दुल सत्तार आघाडीवर
- गंगापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब आघाडीवर
- वैजापूर विधानसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे रमेश बोरनारे आघाडीवर
- पैठण विधानसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे विलास भुमरे आघाडीवर
- फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या अनुराधा चव्हाण आघाडीवर
- कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (उबाठा) उदयसिंग राजपूत आघाडीवर
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024:भाजप उमेदवार मंगलप्रभात लोढा आघाडीवर
- मलबार हिल मतदारसंघातून भाजप उमेदवार मंगलप्रभात लोढा आघाडीवर
- जामनेर मतदारसंघात भाजप उमेदवार गिरीश महाजन आघाडीवर
- काटोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सलील देशमुख पिछाडीवर
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: पोस्टल मतमोजणीतील आघाडीचे उमेदवार
कीनवट मतदारसंघ भाजपचे उमेदवार भीमराव केराम
हदगाव मतदारसंघ काँग्रेसचे उमेदवार माधव पवार
भोकर मतदारसंघ भाजप उमेदवार श्रीजया चव्हाण
नांदेड उत्तर मतदारसंघ उबाठा उमेदवार संगीता डक
नांदेड दक्षिण मतदारसंघअपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते
लोहा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) उमेदवार प्रताप चिखलीकर
नायगाव मतदारसंघ भाजप उमेदवार राजेश पवार
देगलूर मतदारसंघ भाजप उमेदवार जितेश अंतापुरकर
मुखेड मतदारसंघ भाजप उमेदवार डॉ तुषार राठोड
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: उत्तम जानकर आघाडीवर
माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर आघाडीवर
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024:पुरंदरमध्येही पोस्टल मतमोजणीस सुरुवात
- पुरंदरमध्ये हवेली विधानसभेसाठीच्या टपाली मतांच्या मोजणीला सुरुवात
- छत्रपती संभाजीनगर, हिंगोलीमध्येही टपाली मतांच्या मोजणीला सुरुवात
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: मतमोजणीला सुरुवात
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: माझा जनतेच्या मतांवर विश्वास तर विरोधकांचा बोगस मतांवर विश्वास - राजेसाहेब देशमुख
गेल्या 2 दिवसांत मी सर्वसामान्य माणसात फिरल्यावर माझा विजय हा 100 टक्के निश्चित आहे. विरोधकांचा विश्वास बोगस मतांवर आहे तर माझा विश्वास जनतेच्या मतावर आहे- राजेसाहेब देशमुख,परळी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: पोस्टल मतांच्या मोजणीस सुरुवात
नवी मुंबईतील बेलापूरमध्ये टपाली मतांच्या मोजणीला सुरुवात
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: निकाल आमच्या बाजूनेच लागणार - मुरजी पटेल
गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि पुन्हा महायुतीचे सरकार येऊ दे, अशी प्रार्थना केली. विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणूक लढवली, त्यामुळे निकाल आमच्या बाजूने लागणार - मुरजी पटेल, उमेदवार, शिवसेना (शिंदे गट)
#WATCH | Mumbai: Ahead of the counting of votes for #MaharashtraElection2024, Shiv Sena candidate from Andheri East, Murji Patel says, "I had the darshan of Ganpati bappa just now. I prayed to Him for Mahayuti Government in Maharashtra once again. I prayed to him for his… pic.twitter.com/z4gtGd0YhF
— ANI (@ANI) November 23, 2024
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी यंदा राजभवनात होणार नाही ?
निकालानंतर सत्तास्थापन करणाऱ्या युती अथवा आघाडीचा मुख्यमंत्री शपथविधी सोहळा कुठे घ्यायचा, याचा निर्णय घेतील. हा शपथविधी राजभवनातच होईल अशी शक्यता नाही.
शायना एन.सी. यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
मुंबादेवी मतदारसंघाच्या शिवसेना(शिंदे गट) उमेदवार शायना.एन.सी यांनी मतमोजणीपूर्वी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
#WATCH | Shiv Sena candidate from Mumba Devi assembly constituency, Shaina NC visits Shree Siddhivinayak Temple, in Mumbai to offer prayers ahead of counting for #MaharashtraAssemblyElections2024 pic.twitter.com/Ewo2I3opMX
— ANI (@ANI) November 23, 2024
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल!
"महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल आणि मविआच सत्ता स्थापन करेल" रमेश चेन्निथला, काँग्रेस नेते
पिंपरी चिंचवडमध्ये 2 मतदारसंघांसाठी मतमोजणी
भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये 27 टेबल वरती मतमोजणी होणार असून 23 मतदानाच्या फेऱ्या होणार आहेत, तर पिंपरी मध्ये 24 टेबल वरती 20 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी प्रकिया पार पडणार आहे. पिंपरी चिंचवडमधील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये पार पडणार आहे.
महायुतीचा विजय निश्चित- नवनीत राणा
"महायुतीला एकतर्फी विजय मिळेल, भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा उभारी घेईल" नवनीत राणा, भाजप नेत्या
भाजप आणि मित्र पक्षांचा विजय निश्चित! केंद्रीय मंत्री कुमारस्वामी
"सगळ्यांना हेच वाटत आहे की भाजप महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विनासायास सत्ता स्थापन करेल, एक्झिट पोलची भाकितेही हेच सांगत आहेत" एचडी कुमारस्वामी, केंद्रीय मंत्री
मविआ सत्तेवर येईल! कर्नाटकच्या मंत्र्यांना विश्वास
कर्नाटकचे मंत्री जी.परमेश्वर यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला.
VIDEO | Maharashtra Assembly Election Results 2024: "There are two types of predictions, some of them are saying MVA will come to power, while some are saying BJP-Shiv Sena are going to come back to power. However, the ground reality is that MVA is going to come," says Karnataka… pic.twitter.com/DmA3WFdIlA
— Press Trust of India (@PTI_News) November 23, 2024
गडचिरोलीमध्ये मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीमध्ये मतमोजणीच्या23 फेऱ्या,गडचिरोलीमध्ये मतमोजणीच्या 26 फेऱ्या तर अहेरीमध्ये 22 फेऱ्या
मविआला 157 जागा मिळतील असा शरद पवारांचा अंदाज
महाविकास आघाडीला 157 जागा मिळण्याचा शरद पवारांचा अंदाज
महाविकास आघाडीला 160 जागा मिळण्याचा उद्धव ठाकरेंचा अंदाज
नाना पटोले यांना आघाडीला 150 ते 155 जागा मिळण्याचा विश्वास
काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये आघाडीला 158 जागा मिळण्याचा अंदाज
आघाडीच्या नवोदित आमदारांना मुंबई गाठण्याचे आदेश
- आघाडीच्या सर्व नवोदित आमदारांना आजच मुंबई गाठण्याचे आदेश
- सर्व आमदारांना एकाच ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न
- काँग्रेस आमदारांना कर्नाटकमध्ये शिफ्ट करण्याची शक्यता नाही
- परब, पाटील, थोरात, पटोले, राऊत नव्या आमदारांसाठी मैदानात
#WATCH | Mumbai: Ahead of the counting of votes for #MaharashtraElection2024, Shiv Sena (UBT) candidate from Wadala, Shraddha Jadhav says, "Results will come out today. Our victory is certain, you will see it...Maha Vikas Aghadi will form the Government." pic.twitter.com/deIn8IBRQC
— ANI (@ANI) November 23, 2024
जिंतूर आणि गंगाखेड येथे मतमोजणीच्या सर्वाधिक फेऱ्या होणार
- राज्यात मतमोजणीसाठी सर्वाधिक फेऱ्या जिंतूर आणि गंगाखेडमध्ये
- जिंतूरमध्ये मतमोजणीच्या 32 फेऱ्या तर गंगाखेडमध्ये 31 फेऱ्या होणार
- दोन्ही मतदारसंघ परभणी जिल्ह्यातली आहेत.
शरद पवारांची ज्येष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक
- काँग्रेसकडून नवोदित आमदारांसाठी डीके शिवकुमार मैदानात
- फूट टाळण्यासाठी काँग्रेस आमदारांना कर्नाटक मॉडेलचा आधार
- शरद पवारांकडून ज्येष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक
- ठाकरेंकडूनही आमदारांसाठी ऑनलाइन बैठक
- सरकार स्थापनेसाठी दोन्हींकडून काळजीपूर्वक प्रयत्न
- महायुती आणि महाआघाडीत क्लोज फाईटची शक्यता
- सर्वात मोठ्या दोन पक्षांकडून फाइव्ह स्टार हॉटेल्स बुक
- नवोदित आमदारांना सर्टिफिकेटसह तातडीनं मुंबई गाठण्याचे आदेश
- नवोदित आमदारांसाठी चार्टड फ्लाईटसही तयार
- निकालानंतर फूट टाळण्यासाठी रिसॉर्टची तयारी
- त्रिशंकू स्थितीत अपक्ष आमदारांशी आतापासूनच संपर्क
- दोन्हींकडून अपक्ष, बंडखोर यांच्याशी संपर्काची तयारी
- सरकार स्थापनेसाठी 48 तास, त्यामुळे तातडीच्या योजना
मविआ, महायुती की धक्कादायक निकाल? अहिल्यानगर जिल्ह्यात काय असेल निकाल? पत्रकारांसोबत खास चर्चा
सर्वाधिक मतदान हे करवीर मतदारसंघात म्हणजे 84.96 टक्के मतदान झाले
महाराष्ट्र राज्याच्या 288 मतदारसंघामध्ये राज्यात एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत.
यापैकी पुरुष मतदार 5 कोटी 22 हजार 739 तर महिला मतदारांची संख्या 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 इतकी आहे.
Maharashtra Election Results 2024 : या मतदारसंघात महिलांचा सहभाग सर्वाधिक
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता मतदार यादीतील नोंदीत महिलांमध्ये करवीर, चिमूर, ब्रम्हपूरी, नेवासा, कागल, आरमोरी, नवापूर, शाहूवाडी, कुडाळ आणि पळुस-कडेगाव या मतदारसंघांत महिलांचा सहभाग सर्वाधिक दिसून आला.
महाराष्ट्रात मागील 30 वर्षांत यंदा सर्वाधिक 66.05 टक्के मतदान झाले
राज्यात मविआची सत्ता येणार - सचिन पायलट
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्तेत येणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी व्यक्त केला आहे. तसेच बहुमत मिळाल्यानंतर आघाडीतील घटक पक्षांना मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घ्यायला वेळ लागणार नाही. कोणाला कोणते पद द्यायचे? या निर्णयाला एका दिवसापेक्षा जास्त वेळ लागणार नाही - सचिन पायलट
हॉटेल, चॉपर, चार्टर्ड प्लेन... निकालाच्या आधी सर्वच पक्षांची तयारी सुरू
Maharashtra Assembly Result 2024 : महायुती आणि महाविकास आघाडी कुणाला स्पष्ट बहुमत मिळेल? अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे बेरजेचं राजकारण इथे सर्वच पक्षांना सुरु केले आहे.
कोण होणार किंग? कोण ठरणार किंगमेकर? आज होणार फैसला
यवतमाळ येथील मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त, ठिकठिकाण पोलीस तैनात
सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला होणार सुरुवात
#WATCH | Visuals from outside a counting centre in Kalina as the counting for 288 seats that went to poll on November 20 for #MaharashtraAssemblyElections2024 is expected to begin at 8 am, today.
— ANI (@ANI) November 22, 2024
The fate of Mahayuti - the alliance of BJP, Shiv Sena, NCP and Maha Vikas Aghadi -… pic.twitter.com/7AIqLgltD7
निवडणुकीच्या निकालाचे सखोल विश्लेषण फक्त NDTV मराठीवर
Vidhansabha Results | कुणाची येणार सत्ता? निवडणुकीच्या निकालाचे सखोल विश्लेषण फक्त NDTV मराठीवर#vidhansabhaelection2024 #ResultsWithNDTV #NDTVMarathi pic.twitter.com/0sLoQKk47P
— NDTV Marathi (@NDTVMarathi) November 23, 2024
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज होणार मतमोजणी
सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला होणार सुरुवात
माहिम येथील मतमोजणी केंद्राबाहेरील दृश्य
#WATCH | #MaharashtraAssemblyElections2024 | Outside visuals from a counting centre in Mahim as the counting for 288 assembly seats that went to poll on November 20, is expected to begin at 8 am, today. pic.twitter.com/LvE1jFpH2t
— ANI (@ANI) November 22, 2024
Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world