विधानपरिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी ट्विस्ट? मिलिंद नार्वेकर आज अर्ज दाखल करण्याची शक्यता

भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेसाठी 5 जणांची यादी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असताना महाविकास आघाडीने नवा डाव खेळला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर विधानपरिषद निवडणूक लढू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले तर निवडणूक अटळ असेल. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाविकास आघाडीकडून मिलिंद नार्वेकर मंगळवारी (2 जुलै) सकाळी आदित्य ठाकरे आणि काही आमदारांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी विधान भवनातून त्यांचा अर्ज घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडे 15 आमदार आहेत, तर विजयासाठी 23 आमदारांचा कोटा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील आमदारांच्या मदतीने ते आमदार होऊ शकतात, अशी रणनीती महाविकास आघाडीने आखली आहे. 

महाविकास आघाडीकडून 2 उमेदवारांची घोषणा

काँग्रेसकडून डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना उमेवारी जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी डॉ. सातव यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर शेकापच्या जयंत पाटील यांना देखील उमेदवारी जाहीर झाली आहे.  

( नक्की वाचा : पंकजा मुंडे विधानपरिषदेवर, भाजपाकडून 5 जणांना उमेदवारी जाहीर )

भाजपकडून 5 उमेदवार रिंगणात

भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेसाठी 5 जणांची यादी जाहीर केली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडेंसह परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर महिनाभरातच भाजपानं त्यांना विधानपरिषदेवर संधी दिलीय.तर एकनाथ शिंदे शिवसेना आणि एनसीपी अजित पवार प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात असणार आहेत.

Advertisement

(नक्की वाचा- विधानपरिषद निवडणूक निकाल : मुंबईत उबाठाची सरशी, परब, अभ्यंकर विजयी)

निवडणुकीचा कार्यक्रम

2 जुलै - अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
3 जुलै - अर्ज छाणणी
5 जुलै - अर्ज मागे घेण्याची तारीख
12 जुलै - मतदान (सकाळी 9 ते दुपारी 4)
12 जुलै - मतमोजणी (संध्याकाळी 5 वाजता

Topics mentioned in this article