ठाकरे गटाची दुसरी यादी आली, काँग्रेसने दावा केलेल्या 'त्या' जागेवरही उमेदवाराची घोषणा

पहिल्या यादीत ठाकरे गटाने 65 नावांची घोषणा केली होती. त्यामुळे आतापर्यंत 80 उमेदवारांची घोषणा ठाकरे गटाने केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत ठाकरे गटाने एकूण 15 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत ठाकरे गटाने 65 नावांची घोषणा केली होती. त्यामुळे आतापर्यंत 80 उमेदवारांची घोषणा ठाकरे गटाने केली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या यादीत ठाकरे गटाने ज्या जागांवर वाद आहे त्या जागेवरील उमेदवारही जाहीर केले आहेत. त्यामुळे काँग्रेस त्याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवसेना ठाकरे गटाने दुसऱ्या यादीत होल्डवर असलेल्या अजय चौधरी यांना शिवडीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले नव्हते. त्याच बरोबर वडाळ्यातून माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. भायखळा मतदार संघ काँग्रेसला मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. त्या मतदार संघाबाबत चर्चाही सुरूहोती. काँग्रेसचे मधुकर चव्हाण या मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र त्या आधीच शिवसेना ठाकरे गटाने या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. तिथून मनोज जामसुतकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - बाळासाहेब थोरातांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, संगमनेर पेटले, विखे-थोरात वाद चिघळणार?

या शिवाय धुळे शहर मतदार संघातून अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नाशिकच्या देवळाली मतदार संघातून योगेश घोलप यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर बहुचर्चीत कणकवली विधानसभा मतदार संघातून संदेश पारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची लढत भाजपच्या नितेश राणे यांच्या बरोबर होणार आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष होते. ठाकरेंनी इथून सचिन बासरे यांना मैदानात उतरवले आहे.   
   
शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी पुढील प्रमाणे 
 
  धुळे शहर- अनिल गोटे,
 चोपडा -(अज) राजू तडवी,
 जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,
 बुलढाणा- जयश्री शेळके,
 दिग्रस -पवन श्यामलाल जयस्वाल, 
  हिंगोली- रूपाली राजेश पाटील,
 परतूर- आसाराम बोराडे, 
 देवळाली (अजा) योगेश घोलप, 
 कल्याण पश्चिम- सचिन बासरे,
 कल्याण पूर्व - धनंजय बोडारे,
 वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव,
 शिवडी- अजय चौधरी, 
 भायखळा- मनोज जामसुतकर,
 श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे,
 कणकवली- संदेश भास्कर पारकर

Advertisement