Pune News: 'हे नेते दळभद्री यांनी लोकांवर अन्याय केलाच पण देवांवर ही अन्याय केला'

सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पुरंदरचे शिवसेना आमदार विजय शिवतारे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांवर गंभीर आरोप केला आहे
  • शिवतारे आणि पवार यांच्यातील राजकीय तणाव पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढला आहे
  • विजय शिवतारे यांनी पुणे जिल्हा परिषदेत शिवसेना शिंदे गटाशिवाय सत्ता स्थापन होणार नाही असा दावा केला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

देवा राखुंडे 

पुरंदरचे शिवसेना आमदार विजय शिवतारे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर पाच वेळा अजित पवार उपमुख्यमंत्री होते. परंतु यांना पुरंदरचा खंडोबा कधी दिसला नाही. यांनी लोकांवर तर अन्याय केलाच पण देवांवर देखील अन्याय केला असा घणाघाती आरोप शिवतारे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

शिवतारे आणि पवार हे एकमेकांचे कट्टर विरोध मानले जाता. पण आधी लोकसभा मग विधानसभेला त्यांना पवारांसोबत जुळवून घेतलं होतं. पण जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा पवारां विरोधात मोर्चा खोलला आहे. शिवतारे पुढे आणखी गंभीर वक्तव्य केलं आहे. हे नेते दळभद्री, यांनी लोकांवर तर अन्याय केलाच पण देवांवर देखील अन्याय केला असे ही ते म्हणाले.

नक्की वाचा - Dharashiv News: शिंदेंची शिवसेना भाजपच्या आमदाराने केली हायजॅक? ‘ऑडिओ बॉम्ब' ने खळबळ

पुरंदर तालुक्यातील वाल्हे या ठिकाणी विजय शिवतारे यांची जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना विजय शिवतारे यांनी अशा शब्दात टीकेचे झोड उठली. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद पुणे जिल्ह्याच्या राजकारणात उमटणार आहेत. शिवाय शिवसेना शिंदे गटा शिवाय पुणे जिल्हा परिषदेत कुणी ही सत्ता स्थापन करू शकणार नाही असं ही वक्तव्या शिवतारे यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी थेट दोन्ही पवारांना लक्ष्य केलं आहे. 

नक्की वाचा - Pune News: पुण्यात किती उमेदवारांची डिपॉझिट झाले जप्त? डिपॉझिट जप्त होणारे सर्वाधिक उमेदवार कोणत्या पक्षाचे?

सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण आहे. सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढत आहेत. तर शिवसेना शिंदे गटचा  काही ठिकाणी स्वबळाचा नारा आहे. भाजपने ही ताकद लावली आहे. त्याच सोबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट ही मैदानात आहे. अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर अजित पवारांनी जिल्हा परिषद हातची जावू द्यायची नाही यासाठी चंग बांधला आहे.   
 

Advertisement