'3 एफआयआर दाखल, पण पैसे वाटपाची तक्रार नाही' तावडे थेट बोलले

तावडे पत्रकार परिषदे घेवून आपली भूमीका मांडणार होते. पण त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत आपली भूमीका मांडली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

विनोद तावडे विरारमध्ये पैसे वाटण्यासाठी आले होते, त्यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा बहुजन विकास आघाडीने केला आहे. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ज्या हॉटेलमध्ये तावडे आले होते त्याच हॉटेलमध्ये त्यांना बविआच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. शिवाय काही पैसेही त्यांनी पकडले होते. ते पैसे तावडेंना दाखवले जात होते. त्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. या प्रकरणी गुन्हा ही दाखल झाला आहे. या प्रकरणानंतर विरोधकांनी भाजप आणि विनोद तावडेंवर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर तावडे पत्रकार परिषदे घेवून आपली भूमीका मांडणार होते. पण त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत आपली भूमीका मांडली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

झालेल्या घटनेवर स्पष्टीकरण देताना, वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला होता. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत असं ते म्हणाले. शिवाय आपण चहाला या, असं त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो, असं या पत्रकात त्यांनी म्हटलं आहे.  

ट्रेंडिंग बातमी - हा 'नोट जिहाद' आहे का? ठाकरेंचा शिंदे-पवार-फडणवीसांना सवाल

त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला. हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना फोन केला. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली. त्यानंतर हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो. 

ट्रेंडिंग बातमी - 'विनोद तावडे गोदामात लपले होते, ते तिकडे काय करत होते?' ठाकूरांचे गंभीर आरोप

त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. असंही तावडे म्हणाले. त्याच बरोबर राहुल गांधी, सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत  निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी या पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी केली. दरम्यान तिथे झालेल्या घटनेचे तीन एफआयआर दाखल झाल्याचं तावडे म्हणाले. यात पैशा बाबतचा एकही एफआयआर नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - "माझी चूक झाली, मला इथून सोडवा, विनोद तावडेंचा फोन", हिंतेंद्र ठाकूरांचा दावा 

आम्ही दोघांनी तिथे प्रेस घेतली  त्याचा गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय मी मतदार संघात नसताना तिथे गेलो त्याचा एक गुन्हा दाखल झाला आहे. तर  हितेंद्र ठाकूर ही त्यांचा मतदार संघ नसताना तिथे आले. त्याचा एक गुन्हा असे तिन गुन्हे दाखल झाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पैसे वाटपाच्या गोष्टी खोट्या असल्याचं तावडे म्हणाले. शिवाय हितेंद्र ठाकूर यांना भाजपच्या लोकांनी टीप दिली होती हे पण खोटं आहे असंही ते पत्रकारांबरोबर बोलताना म्हणाले.