जाहिरात

"माझी चूक झाली, मला इथून सोडवा, विनोद तावडेंचा फोन", हिंतेंद्र ठाकूरांचा दावा 

विनोद तावडे यांना सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र बविआचे अध्यक्ष आणि आमदार हिंतेंद्र ठाकूरन यांना मोठा दावा केला आहे. विनोद यांनी मला बरेच फोन केले आहेत. माझी चूक झाली, मला इथून सोडवा, अशी विनंती मला त्यांनी केली असा दावाही हिंतेंद्र ठाकूर यांनी केला आहे. 

"माझी चूक झाली, मला इथून सोडवा, विनोद तावडेंचा फोन", हिंतेंद्र ठाकूरांचा दावा 

मनोज सातवी, विरार

भाजपचे महासचिव विनोद तावडे यांच्यावर पैसेवाटप झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. विरारमध्ये विनोद तावडे यांना याच आरोपावरून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसमोर विनोद तावडे आणि पोलीस देखील हतबल झाल्याचा पाहायला मिळत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विनोद तावडे यांना सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र बविआचे अध्यक्ष आणि आमदार हिंतेंद्र ठाकूरन यांना मोठा दावा केला आहे. विनोद यांनी मला बरेच फोन केले आहेत. माझी चूक झाली, मला इथून सोडवा, अशी विनंती मला त्यांनी केली असा दावाही हिंतेंद्र ठाकूर यांनी केला आहे. 

(नक्की वाचा- VIDEO : पैसे वाटपाचा आरोप, विनोद तावडेंना घेरलं; विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा फुल राडा)

विनोद तावडे पाच कोटी रुपये घेऊन येत असल्याची आम्ही भाजपच्याच नेत्यांनी माहिती दिली होती. आम्हाला वाटलं राष्ट्रीय नेता पैसे वाटप करणार नाही. मात्र पैसे वाटप आधीच झाले. मात्र विनोद तावडे तिथे एक बैठक घेत होते. विनोद तावडे राष्ट्रीय नेते आहेत मात्र त्यांना मतदानाच्या याधी मतदारसंघ सोडावा एवढी अक्कल नाही का? असा सवाल हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित केला. 

(नक्की वाचा - राहुल गांधींना 'ते' वक्तव्य भोवणार?  पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश )

"गुन्हा दाखल केल्याशिवाय सोडणार नाही"

आम्ही गुन्हा दाखल केल्याशिवाय त्यांना आम्ही सोडणार नाही. आता मी देखील तिथे पोहचत आहे. पोलिसांना कारवाई केली तर ठीक. अन्यथा त्यांना उद्या मतदान संपेपर्यंत विनोद तावडेंचा मुक्काम तिथेच असेल, असा इशाराही हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे.  भाजपच्या नेत्यांनी मला सांगितलं की तुम्ही जे करताय ते फार चांगलं करत आहात. हे करत राहा, धडा शिकवा, अशी विनंती मला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांने केली आहे. ते नेते कोण ते समजून घ्या, असा खळबळजनक दावा देखील हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com