- देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली अ
- पश्चिम बंगालमध्ये भाजपने बहुमताचा आकडा ओलांडून 175 जागांवर आघाडी घेतली असून तृणमूल काँग्रेस पिछाडीवर आहे
- तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाने ९८ पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे
देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. पहिल्या दोन तासांतील कल पाहता अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची (TMC) पिछेहाट होताना दिसत असून, भाजपने मुसंडी मारली आहे. तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय याच्या टीव्हीके (TVK) पक्षाने पहिल्याच निवडणुकीत जोरदार एन्ट्री केली आहे. सकाळी १० वाजेपर्यंतच्या कलानुसार व्हीव्हीआयपी उमेदवारांची स्थिती पहाता त्यांना आणि त्यांच्या पक्षाला धडकी भरवणारीच ठरली आहे.
पश्चिम बंगालमध्ये सुरूवातीला ममता बॅनर्जी पिछाडीवर होत्या. भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी सध्या भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांच्यापेक्षा 1558 मतांनी मागे आहेत. बंगालमध्ये भाजपने बहुमताचा 148 हा आकडा पार केला असून ते 175 जागांवर आघाडीवर आहेत. तर टीएमसी 115 जागांवर रेंगाळली आहे. मात्र काही वेळानंतर ममता बॅनर्जी यांनी शुवेंदू अधिकारी यांनी पिछाडीवर टाकले. या शिवाय दिलीप घोष, अशोक डिंडा,रुपा गांगुली हे भाजप उमेदवार आघाडीवर होते.
तामिळनाडू यावेळी अभिनेता विजयचा 'धमाका' पाहायला मिळाला. तामिळनाडूमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली दिसत आहेत. अभिनेता विजय यांच्या तामिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने 98 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत सत्ताधारी डीएमकेला (DMK) तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. खुद्द मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन कोलाथूर मतदारसंघातून टीव्हीकेच्या उमेदवारापेक्षा 1234 मतांनी पिछाडीवर आहेत. विजय हे दोन मतदार संघातून आघाडीवर आहेत. या शिवाय एआयडीएमकेचे पलानिस्वामी हे आघाडीवर आहेत. तर उधयनिधी स्टॅलन हे ही पिछाडीवर आहेत.
नक्की वाचा - Assembly election Result LIVE 2026: तामिळनाडूत डीएमके तर केरळमध्ये काँग्रेस आघाडीवर
केरळमध्ये काँग्रेस आघाडीने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ (UDF) 90 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असून सत्तांतराचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सत्ताधारी एलडीएफ (LDF)50 जागांच्या आतच मर्यादित राहताना दिसत आहे. पलक्कडमध्ये भाजपच्या शोभा सुरेंद्रन यांना धक्का बसला असून त्या पिछाडीवर आहेत. शिवाय मुख्यमंत्री पिनराई विजयन हे ही पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे वीडी.सतिशन हे आघाडीवर आहेत. चेडी ओमेने हे कांग्रेस नेते आघाडीवर आहे. तर भाजपचे वी मुरलीधरन पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे सनी जोसेफ ही पिछाडीवर होते.
आसाममध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. गेल्या वेळ पेक्षा जास्त जागा भाजप इथं जिंकण्याची स्थिती आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे गौरव गोगई हे जोरहाट मधून पिछाडीवर आहेत. एजेरीचे नेते लुरिंज्योती गोगई हे ही पिछाडीवर होते. अंजता नेओगे हे भाजप नेते आघाडीवर होते. आसाममध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सत्तेत येण्याचे काँग्रेसचे स्वप्न आसाम मध्ये भंगताना दिसत आहे.