Amit Thackeray and Aaditya Thackeray Property : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे कुटुंबीयातील दोन जण मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. तर राज ठाकरे यांचे पुत्र माहीम विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंनी अर्ज दाखल केला आहे.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी अर्ज दाखल करताना संपत्तींच प्रतिज्ञापत्र देखील निवडणूक आयोगाला सादर केलं आहे. त्यानंतर दोघांचीही किती संपत्ती आहे हे उघड झालं आहे. ठाकरे घराण्यातील पुढच्या पिढीच्या नेत्यांमध्ये सध्या कोण श्रीमंत आहे याची माहिती यामधून पहिल्यांदाच उघड झालीय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमित ठाकरेंची संपत्ती किती ?
निवडणूक आयोगापुढं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार अमित ठाकरे यांच्या हातामधील रक्कम 1 लाख 8 हजार इतकी आहे. त्यांच्या बँक खात्यात 40 लाख 99 हजार जमा आहेत. त्यांच्याकडील एकूण ठेवी 6 कोटी 29 लाख रुपयांच्या आहेत.
शेअर्स आणि म्युचअल फंडातील गुंतवणूकीचे बाजारमुल्य 3 कोटी 98 लाख इतके आहे. PPF मधील गुंतवणूक 20 लाख 37 हजार इतकी असून कर्ज दिल्यानंतर मिळणारा लाभापोटी त्यांना राज ठाकरे यांच्याकडून 84 लाख 44 हजार रुपये मिळाल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रकात देण्यात आली आहे.
अमित ठाकरेंच्या चल मालमत्तेचं एकूण मुल्य 12 कोटी 54 लाख इतकं आहे. त्यांच्या अचल मालमत्तेचं मुल्य 94 लाख, 14 हजार 220 आहे. त्यांच्या डोक्यावर कर्ज 4 कोटी 19 लाख 99 हजार 508 रुपये इतकं आहे. हे कर्ज त्यांनी एकविरा ट्रस्ट, मधुवंती ठाकरे, शर्मिला ठाकरे, उर्वशी ठाकरे, मिताली ठाकरे यांच्याकडून घेतलं आहे, अशी माहिती प्रतिज्ञापत्रकातून उघड झाली आहे.
अमित ठाकरे यांनी त्यांचा व्यवसाय ऑपरेशल अँड टेक्निकल एक्झिेकेटिव्ह आहे, अशी माहिती दिली आहे. तसंच त्यांच्या नावावर कोणताही गुन्हा नसल्याचं त्यांनी या प्रतिज्ञापत्रकात स्पष्ट केलंय.
( नक्की वाचा : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये श्रीमंत कोण ? दोघांपेक्षा पत्नींवर लक्ष्मीची अधिक कृपा )
आदित्य ठाकरेंची संपत्ती
आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना संपत्तींच प्रतिज्ञापत्र देखील निवडणूक आयोगाला सादर केलं आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, आदित्य ठाकरेंकडे 15 कोटींहून अधिकची चल संपत्ती आहे. तर 6 कोटी 4 लाख रुपयांची अचल संपत्ती आहे.
आदित्य ठाकरे यांनी त्यांचा व्यवसाय सामाजिक आणि राजकीय सेवा दिला आहे. उत्पन्नाचा स्त्रोत हा व्याज, भाडे, डिव्हिडंट आणि पगार असा केला आहे. मात्र ते नोकरी कुठे करतात याचा उल्लेख नाही. आदित्य ठाकरेंनी 43 लाखांचे कर्जही घेतल्याचेही प्रतज्ञापत्रात दाखवले आहे.
- आदित्य ठाकरेंच्या बँकेतील रक्कम आणि ठेवी - 2 कोटी 81 लाख रुपये
- हिंदू अविभक्त कुटुंबाचा भाग म्हणून असलेल्या बँक खात्यात 15 लाख 97 हजार रुपये
- श्री अॅस्टर सिलिक्टेस लिमिटेड या डिलिस्टेड कंपनीचे 50 हजार शेअर असून ते 5 लाखांना घेतले होते ज्याची किंमत 30 सप्टेंबर 2024 रोजी 70 हजार रुपये झाली होती.
- ICICI डीप डिस्काऊंट बॉण्ड - 5500 रुपयांना खरेदी, 30 सप्टेंबर 2024 रोजीची किंमत 50 हजार रुपये
- म्युच्युअल फंडातील एकूण रक्कम 10 कोटी 13 लाख रुपये
- म्युच्युअल फंड आणि शेअरमधील एकूण गुंतवणूक - 10 कोटी 14 लाख रुपये
- हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक
- GTL लिमिटेडचे दीड कोटी रुपयांचे 69 हजारांपेक्षा अधिक शेअर्स घेतले होते. या शेअर्सची आजची किंमत फक्त 8 लाख 93 हजार इतकी झाली आहे. 2003 साली या कुटुंबाने मारूती सुझुकी कंपनीचे 500 शेअर्स घेतले होते. शेअर्सची खरेदी किंमत 62 हजार रुपये इतकी होती, 20 वर्षांनंतर या शेअर्सची किंमत 66 लाख 14 हजार रुपये झाली आहे. ठाकरे कुटुंबाला म्युस कारा आणि सनग्रेस मफतलाल लिमिटेड कंपनीचे 57 हजार शेअर्स शून्य रुपयाला मिळाल्याचे दाखवण्यात आले आहे. या शेअर्सची किंमत 30 सप्टेंबर रोजी 57 हजार रुपये इतकी होती.
आदित्य ठाकरेंकडे दागिने किती?
आदित्य ठाकरेंकडे सोनं आणि हिऱ्याचं ब्रेसलेट आहे. ज्याची किंमत 3 लाख 90 हजार रुपये. या ब्रेसलेटमध्ये 535 हिरे आहेत. दोन हिरेजडीत सोन्याच्या बांगड्या आहेत ज्याची किंमत 47 लाख 42 हजार रुपये आहे. याशिवाय 24 कॅरेट सोन्याची 1 किलो 466 ग्रॅमची नाणी आणि बिस्किट आहेत. त्याची किंमत 1 कोटी 9 लाख 95 हजार आहे. याव्यतिरिक्त 239 ग्रॅमचा रत्नजडीत हार सुद्धा आदित्य ठाकरेंच्या मालकीचा आहे. त्याची किंमत 1 कोटी 33 लाख रुपये आहे. आदित्य ठाकरेंकडे असलेल्या एकूण सोने-चांदीच्या दागिन्यांची किंमत 1 कोटी 91 लाख रुपये दाखवण्यात आली आहे. हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून ठाकरे कुटुंबाकडे सोनं आणि चांदीचे सुमारे 84 लाख 3 हजाराचे दागिने आहेत.
( नक्की वाचा : CM एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीत 5 वर्षात तब्बल 26.11 कोटींची वाढ, एकूण संपत्ती किती? )
आदित्य ठाकरेंनी कर्जत येथे 10 जानेवारी 2020 मध्ये एक जागा विकत घेतली होती. या जागेची किंमत नमूद करण्यात आलेली नाही. ही जागा आदित्य यांनी त्यांची आजी माधवी पाटणकर यांना 3 मार्च 2021 रोजी गिफ्ट डीडच्या माध्यमातून नावे केली. ही जमीन कर्जतच्या भिसेगांव इथे असून या जागेचे क्षेत्रफळ जवळपास 171 स्क्वेअर मीटर इतकी आहे. आदित्य ठाकरेंकडं एक BMW कार देखील आहे.