संजय तिवारी, प्रतिनिधी
लोकसभेत दुसऱ्या क्रमांकानं खासदार पाठणारं महाराष्ट्र हे राज्य काँग्रेसचा ऐकेकाळी बालेकिल्ला होता. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत हा बालेकिल्ला पार कोसळला आहे. 2014 साली 2 तर 19 मध्ये राज्यात काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली. 2019 नंतरची अडीच वर्ष राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडी पक्षाचं सरकार होतं. या आघाडीमध्ये काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचं मानलं जात होतं. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसकडं दुय्यम मंत्रिपद होती.
या जागावाटपानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागा लढवणार आहे. सांगली, भिवंडी, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या जागा काँग्रेसनं वाटाघाटीत गमावल्या आहेत. उत्तर पश्चिम मुंबईची जागा शिवसेनेला गेल्यानं संजय निरुपम यांनी काँग्रेस नेतृत्त्वावर टीका केली होती.
मविआच्या जागावाटपात काँग्रेसची कोंडी, महत्त्वाच्या जागा गमावल्या
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले राज्यातील पक्षाच्या अवस्थेला जबाबदार आहेत का? नाना पटोलेंवरील नाराजीतून काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरु आहे का? जागावाटपात काँग्रेसची कोंडी होण्यास नाना पटोले जबाबदार आहेत का? या सर्व प्रश्नावर नागपूरमधील काँग्रेस कार्यर्त्यांनी NDTV मराठीशी बोलताना त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
शेवटचा कार्यकर्ता सोडून जाण्याची वाट पाहणार का?
पक्षाला जी गळती लागली आहे. मोठमोठे नेते काँग्रेस सोडून चालले आहेत. या नेत्यांना पक्ष नेतृत्वातर्फे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होणं गरजेचं होतं. आपण किती दिवस वाट बघायची नेते सोडून जात असताना. शेवटचा कार्यकर्ता सोडून जाण्याची वाट आपण बघायची का? माझ्याप्रमाणे असंख्य कार्यकर्त्यांची हीच भावना आहे. राहुल गांधी खूप छान काम करत आहे. त्यांनी काढलेल्या यात्रांमुळे लोकांमध्ये चांगला संदेश गेला आहे. मी दलित समाजाचा आहे. संविधान वाचवण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षालाच मदत करू, अशी भावना बाबा बनसोड यांनी व्यक्त केली आहे.
सांगलीची हीट ही काँग्रेसचीच सीट होती. विश्वजीत कदमांना विश्वासात न घेता उद्धव ठाकरेंनी तिथे उमेदवार जाहीर केली. तिथल्या जागेसाठी आग्रह न धरता हातची जाऊ दिल्याची खंत कार्यकर्त्यांमध्ये आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे दरवेळी काँग्रेसने नमती बाजू घेणं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना योग्य वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
'आम्ही मनसे का सोडली?' राज ठाकरेंच्या जुन्या सहकाऱ्यांनी सांगितली 'मन की बात'
नाना पटोलेंबद्दल नाराजी नाही, जे आक्षेप घेत आहे ती भीतीमुळे आक्षेप घेत आहेत, असं नागपूरमधील यूवक काँग्रेस कार्यकर्ते निलेश खोब्रागडे यांनी सांगितलं. तर, आम्ही युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत, आमची नाळ जमिनीशी जोडलेली आहे. मोठ्या नेत्यांना बऱ्याच गोष्टी हव्या असतात. त्यांनी सुरक्षा हवी असतात. आम्हाला मोठे नेते काय करतात यचा फरक पडत नाही, असं रविंद्रसिंह भामरा यांनी सांगितलं.
आपल्या मतानुसार व्हावं असं सर्वांना वाटतं. ते होत नसल्यानं या सगळ्या गोष्टी (पक्ष सोडण्याच्या) घडत आहेत, असं मत संतोष खडसे यांनी व्यक्त करत नाना पटोले यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला आहे.