नितेश राणेंना त्यांच्या गडात आव्हान देणारे संदेश पारकर कोण?

नितेश राणे सलग दोन वेळा या मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांना यावेळी हॅटट्रीक करण्याची संधी आहे. मात्र त्यांच्या समोर संदेश पारकर यांचे आव्हान असणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
सिंधुदुर्ग:

भाजपने कणकवली विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार नितेश राणे यांना उमदेवारी दिली आहे. कणकवली देवगड हा मतदार संघ राणे आणि भाजपचा गड समजला जातो. नितेश राणे सलग दोन वेळा या मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांना यावेळी हॅटट्रीक करण्याची संधी आहे. मात्र त्यांच्या समोर संदेश पारकर यांचे आव्हान असणार आहे. संदेश पारकर हे डॅशिंग नेते म्हणून ओळखले जाता. राणे शिवसेनेत असताना यांच्या समोर संदेश पारकर यांनीच सिंधुदुर्गात आव्हान उभे केले होते. राणे काँग्रेसमध्ये आल्यानंतर पारकर यांनीही पक्ष बदलला होता. आता पारकर हे शिवसेनेत आहेत. त्यांना उद्धव ठाकरे यांनी कणकवली मतदार संघातून नितेश राणें विरोधात उमेदवारी दिली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संदेश पारकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात काँग्रेसमधून केली होती. नारायण राणे शिवसेनेत होते. त्यावेळी सिंधुदुर्गात राणेंचे वर्चस्व होते. प्रत्येक सत्ता केंद्र राणेंच्या ताब्यात होते. त्याच वेळी कणकवली नगरपरिषदत संदेश पारकर यांनी एकहाती आपल्या हातात ठेवली होती. राणेंना त्यांच्याच गावातील नगरपरिषद जिंकता आली नव्हती. याची सल नेहमीच राणे यांना राहीली आहे. राणे यांना टोकाचा राजकीय विरोध संदेश पारकर यांनी केला होता. पारकर यांनी काँग्रेस प्रमाणे राष्ट्रवादी, भाजपनंतर शिवसेनेत काम केले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - ठाकरे गटाची दुसरी यादी आली, काँग्रेसने दावा केलेल्या 'त्या' जागेवरही उमेदवाराची घोषणा

काँग्रेसनेते श्रीधर नाईक यांच्या हत्येनंतर सिंधुदुर्गातील राजकीय स्थितीत संपूर्ण पणे बदलून गेली होती. शिवसेनेला विरोध करणारा तसा ताकदवान नेता जिल्ह्यात नव्हता. त्या काळात संदेश पारकर यांनी नारायण राणे यांच्या विरोधात दोन हात केले. काँग्रेसचे संघटन वाढवले. काँग्रेसला जिल्ह्यात जिवंत ठेवली. पारकर यांची ओळख राणेंची कट्टर विरोधक म्हणून आहे. अनेक वर्ष त्यांनी कणकवली नगरपरिषदेवर नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे. पण त्यांना विधानसभा किंवा विधान परिषदेवर जाण्याची कधीही संधी मिळाली नाही.   

ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसची दुसरी यादी आली, 'या' बड्या नेत्यांना पुन्हा संधी, तर वादग्रस्त जागांवरही उमेदवार

राणेंना त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतत विरोध केला आहे. त्यांनी राणें विरोधात विधानसभेची निवडणुकही लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. आता पारकर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते कणकवली या आपल्या होमग्राऊंडवरच्या मतदार संघातून निवडणूक मैदानात आहेत. ते यावेळी नितेश राणेंना आव्हान देणार आहेत. मी जिंकण्यासाठी उभा राहिलो आहे असं ते सांगत आहे. नितेश राणेंचा पराभव निश्चित असल्याचा विश्वासही त्यांना आहे. 

ट्रेंडिंग बातमी - लोकसभेतील मैत्री विधानसभेत तुटली! मुंबईतील जागांवरुन शिंदे-ठाकरे, आमने-सामने

आपले कार्यकर्ते फार मेहनत घेत आहेत. नितेश राणेंना सक्षम पर्याय महाविकास आघाडीने दिलाय असेही या निमित्ताने पारकर म्हणाले आहे. एकदा जनतेचा उद्रेक झाल्यानंतर भलेभले या लोकशाहीत पराभूत झाले आहेत. नारायण राणेंना अहंकार झालेला होता. त्यांचा देखील पराभव झाला याची आठवण या निमित्ताने त्यांनी नितेश राणे यांना करून दिली आहे. राणेंची लोकांमध्ये भय दहशत निर्माण करण्याचा पारंपरिक प्रयत्न आहे. पैशाचे वाटप करून निर्णायक मते घेऊन विजयी व्हायचं हाच कारभार त्यांचा राहिलेला आहे असा आरोपही त्यांनी केला.  त्याला आता लोक कंटाळलेली आहेत. त्यामुळे आपण निवडून येऊ असं त्यांनी स्पष्ट केले.