प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी
Nashik Municipal Corporation Election 2026 : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या काही दिवसात गटनेत्याची निवड केली जाणार आहे. गटनोंदणी होताच महापौर निवडला जाणार असून नाशिक महापौर पदासाठी काय आरक्षण निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भाजपला नाशिकमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपचाच महापौर होणार हे निश्चित झालंय. मात्र भाजपमध्ये महापौर पदासाठी मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे महापौर पद महत्त्वाचे असल्याने गिरीश महाजन तर थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत इच्छुकांची जोरदार लॉबिंग सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
भाजपमध्ये महापौर पदासाठी जोरदार स्पर्धा
नाशिक महानगरपालिका निवडणुकीतील १२२ जागांपैकी भाजपला 72, शिवसेना शिंदे गटाला 26, काँग्रेस 3, अजित पवार गट 4, मनसे 1, आरपीआय १ अशा जागा मिळाल्या आहेत. दरम्यान महापौर पदाचा निर्णय प्रदेश कोअर कमिटी घेईल असं स्पष्टीकरण भाजप शहराध्यक्षांकडून देण्यात आलं आहे. भाजपा बहुमताने सत्तेत येणार असून गटनेता झाल्यानंतर गटनोंदणी होईल. महापौर पदाचा निर्णय प्रदेश कोअर कमिटी घेईल आणि तोच महापौर होईल. भाजपमध्ये महापौर पदासाठी जोरदार स्पर्धा रंगली आहे.
किती दावेदार?
खुल्या प्रवर्गातून - हिमगौरी आडके, दिपाली कुलकर्णी, स्वाती भामरे, सुरेश पाटील, दिनकर पाटील
ओबीसी प्रवर्ग - दिपाली गिते, प्रियंका माने, सुप्रिया खोडे, सुधाकर बडगुजर, मच्छिन्द्र सानप,
एससी प्रवर्ग - रुपाली नन्नावरे, सविता काळे, कोमल मेहेरोलीया, प्रशांत दिवे
एसटी प्रवर्ग - सरिता सोनवणे, रुपाली निकुळे, रंजना भानसी