शरद पवारांनी सध्या सभांचा धडाका लावला आहे. ते सध्या मराठवाड्यातील मतदार संघात मविआच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यांनी लावलेल्या सभांच्या धडाक्यामुळे सर्वच जण आवाक झाले आहेत. तरुणांनाही लाजवेल अशी धडाडी वयाच्या 84 व्या वर्षीही शरद पवार दाखवत आहे. त्यामुळे तरूणी त्यांच्या सभांना मोठी गर्दी करत असताना दिसत आहेत. परांडा विधानसभा मतदार संघात शरद पवार प्रचाराला आले होते. त्यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पवारांना या वयात ही तुम्ही हिंडत आहात अशी विचारणा केली. त्यावर पवारांनी मी काय म्हातारा झालोय का? असा प्रतिप्रश्न ओमराजेंना विचारला. त्यानंतर सभाच्या ठिकाणी एकच हंशा पिकला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
परांडा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राहुल मोटे हे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार आले होते. त्यावेळी काळजी म्हणून ओमराजेंनी शरद पवारांना तुम्ही या वयातही हिंडत आहात अशी विचारणा केली. त्यावर सभेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले ओमराजे माझ्या तब्बेती विषयी विचारत होते. या वयातही तुम्ही हिंडत आहात असं विचारले. मी म्हणतो मी काय म्हातारा झालायो का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला.
ट्रेंडिंग बातमी - आक्रीत घडलं! ठाकरे सेनेनं चक्क भाजप उमेदवाराला दिला पाठिंबा? कुठे घडलं?
पुढे शरद पवार म्हणाली की मी अजूनही म्हातारा झालेलो नाही. या महायुतीच्या लोकांना घरी बसवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हे सरकार बदलल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुमच्या प्रश्नांची सोडवणूक होताना जोपर्यंत आमचं सरकार करत नाही तो पर्यंत मी म्हाताराही होणार नाही असं त्यांनी जाहीर सभेत सांगितलं. यावेळी उपस्थित तरूणांनी सभा शिट्ट्या आणि टाळ्यांनी डोक्यावर घेतली. यावेळी शरद पवारांनाही आपले हसू आवरता आले नाही.
भाजपला रोखण्यासाठी आम्ही इंडिया आघाडी बनवली. मोदींना चारशे जागा हव्या होत्या. त्या कशासाठी हव्या होत्या. तर चारशे जागा असतील तर संविधान बदलता येते. हा भाजपचा डाव होता. संविधान बदलले गेले असते तर तुमच्या आमच्या अधिकारावर गदा आली असती. पण महाराष्ट्रातल्या जनतेने 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी केले. मोदींच्या डाव महाराष्ट्रातल्या जनतेने उधळवून लावला. घटना वाचवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. विधानसभा निवडणुकीत ही या सरकारला आपल्याला घालवायचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.