Bollywood news : 180 फ्लॉप चित्रपट, श्रीदेवी बरोबर लग्न,आता ओळखला जातो गॉड ऑफ बॉलीवुड, ओळखलं का?

हा अभिनेता सुपरस्टार आहे. पण तरीही त्याने एक दोन नाही तर तब्बल 180 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. विशेष म्हणजे त्यातले 33 चित्रपट हे लागोपाठ फ्लॉप झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

बॉलिवूडमध्ये स्टार होण्यासाठी बॉक्स ऑफीसवर कलेक्शन महत्वाचं ठरतं. पण तेवढ्यावरच त्याचं स्टार होणं ठरत नाही. तर त्यासाठी त्याचा चाहता वर्गही महत्वाचा आहे. त्याची फॅन फॉलोइंग किती आहे यावर ही तो किती मोठा स्टार आहे हे ठरतं. त्यामुळे काहींचे एकामागोमाग एक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरही ते अभिनेते मोठे स्टार्स म्हणून ओळखले जातात. आज आपण अशाच एका स्टार्सबाबत बोलणार आहोत. हा अभिनेता सुपरस्टार आहे. पण तरीही त्याने एक दोन नाही तर तब्बल 180  फ्लॉप चित्रपट दिले आहेत. विशेष म्हणजे त्यातले 33 चित्रपट हे लागोपाठ फ्लॉप झाले आहेत. मात्र त्यांचा चाहता वर्गच इतका आहे की त्यांना स्टार्सच्या लाईनमध्ये उभा  करतो. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

80-90 च्या दशकात हा सुपरस्टार होता. त्याचं नाव मिथुन चक्रवर्ती आहे. मिथुन चक्रवर्तीने 40 वर्षाच्या आपल्या करिअरमध्ये जवळपास 180 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. त्यांनी जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा हिरो म्हणून शेवटचा हिट चित्रपट 1998 साली दिला होता. 'चंडाल' हा तो चित्रपट होता. त्यानंतर ते गुरू आणि गोलमाल 3 या चित्रपटात ते साईड रोलमध्ये ही झळकले होते. हे चित्रपट हीट झाले. मात्र 1998 नंतर प्रदर्शित झालेला त्यांचा प्रत्येक चित्रपट फ्लॉप ठरला आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Bollywood News: बॉलिवूड सोडलं अन् साध्वी झाली, मिस वर्ल्ड टूरिझम राहिलेली 'ती' अभिनेत्री कोण?

मिथुनची एक काळ मोठी लोकप्रियता होता. त्याने त्यावेळची सुपरस्टार श्रीदेवी बरोबर लग्नही केले होते. मात्र फ्लॉप चित्रपटांचा ससेमिरा त्यांच्या मागेच लागला. फ्लॉप चित्रपट देण्याच्या त्यांच्या रेकॉर्डच्या अजूबाजूलाही  दुसरा कुणी कलाकार नाही. दुसऱ्या कलाकारांचे सांगायचे झाल्यास गोविंदाने 76 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. तर अक्षय कुमार ने जवळपास 60 फ्लॉप चित्रपट दिले आहे. अनिल कपूर, अमिताभ बच्चन, सनी देओल आणि संजय दत्त यांनी 50 पेक्षा जास्त फ्लॉप चित्रपट दिले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Arrest warrant against Sonu Sood : अभिनेता सोनू सूदविरोधात अटक वॉरंट जारी, काय आहे प्रकरण?

मिथुन चक्रीवर्ती यांनी लागोपाठ 33 फ्लॉप चित्रपट देण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. 1998 साली त्यांचा चंडाल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो हिट झाला होता. त्यानंतर मात्र त्यांनी फ्लॉप चित्रपट देण्याचा धडाका लावला. त्यांनी पुढच्या 9 वर्षात जवळपास 33 चित्रपटात अभिनय केला. हे सर्व चित्रपट दणकून आपटले. हिटलर, यमराज, गंगा की कसम, बिल्ला नंबर 786, अग्निपुत्र, चालबाज, एलान और चिंगारी शामिल या सारख्या चित्रपटांचा त्यात समावेश आहे.

ट्रेंडिंग बातमी - Veer Paharia : कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणात 12 जणांवर गुन्हा, वीर पहारियाबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचा राग

या 33 चित्रपटां पैकी एकाही चित्रपटाला 5 कोटींचाही गल्ला जमवता आला नाही. मात्र मणिरत्नम यांचा गुरू या चित्रपटात मिथुन यांनी अभिनय केला. 33 चित्रपटांच्या अपयशानंतर मिथुन यांना पहिला हिट चित्रपट गुरूच्या रुपाने देता आला. या चित्रपटात अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आर. माधवन यांनी लिड रोल केले होते.