जाहिरात

Bollywood News: बॉलिवूड सोडलं अन् साध्वी झाली, मिस वर्ल्ड टूरिझम राहिलेली 'ती' अभिनेत्री कोण?

जानेवारी महिन्यात इशिकाने शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशातील जबलपूर इथं दिक्षा घेतली होती.

Bollywood News: बॉलिवूड सोडलं अन् साध्वी झाली, मिस वर्ल्ड टूरिझम राहिलेली 'ती' अभिनेत्री कोण?
मुंबई:

बॉलिवूडमध्ये काही चित्रपट आणि म्युझिक अल्बममध्ये आपला जलवा दाखवलेल्या एका अभिनेत्रीने आता बॉलिवूडला बायबाय केला आहे. तिने अध्यात्माचा मार्ग स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. ही अभिनेत्री आता साध्वी झाली आहे. शिवाय ती आता यापुढच्या काळात अध्यात्म आणि सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करणार असल्याचं तिने ठरवलं आहे. ती अभिनया बरोबर मिस वर्ल्ड टूरिझम ठरली होती. त्याच बरोबर तिचे नाव गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये ही नोंद झाले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या अभिनेत्रीचे नाव इशिका तनेजा असं आहे. इशिकाने साध्वी बनण्याचा निर्णय घेतला आहे. ती आता अध्यात्माच्या मार्गाने जाणार आहे. 29 जानेवारीला मौनी अमावस्येला ती महाकुंभ मेळ्यात गेली होती. तिथेच तिने आपल्या जीवनाची नवी सुरूवात करण्याचा निर्णय घेतला. इथं तिने त्रिवेणी संगमात स्थान केले. त्यानंतर तिने या पुढच्या काळात सनातन धर्माच्या वाढीसाठी आपण काम करणार असल्याची शपथ घेतली. 

ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025: सिडको माझे पसंतीचे घर सर्वांनाच मिळणार? 26 हजार घरांसाठी किती अर्ज?

इशिका तनेजा  2018 मध्ये मिस वर्ल्ड टूरिज्म झाली होती. 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारतातल्या 100 यशस्वी महिलांच्या श्रेणीत तिला राष्ट्रपती पुरस्कारही दिला होता. 2017 मध्ये मधुर भंडारकर यांच्या इंदु सरकार या चित्रपटात तिने अभिनय ही केला होता. शिवाय विक्रम भट्ट यांच्या हद या सिरीजमध्ये ही काम केले होते. इशिकाच्या नावावार  मेकअप करण्याचं गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड आहे. 

ट्रेंडिंग बातमी - पहिल्याच बॉलिवूड सिनेमात तेजश्री प्रधानने दिला किसिंग सीन, चाहत्यांनीही व्यक्त केले होते आश्चर्य

जानेवारी महिन्यात इशिकाने शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशातील जबलपूर इथं दिक्षा घेतली होती. त्यानंतर ती म्हणाली होती की महिलांचं काम छोटे कपडे घालून केवळ नाचणे नाही. उलट सनातन धर्माची सेवा करणे हे काम आहे. शिवाय  साध्वी होणं हा पब्लिसिटी स्टंट नाही असंही तिने स्पष्ट केलं आहे. त्याच बरोबर आपण बॉलिवूडमध्ये परत जाणार नाही असं ही सांगितलं आहे. संधी मिळाली तर चित्रपट तयार करण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे. मात्र हा चित्रपट सनातन धर्माचा प्रचार करणार असेल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: