![Arrest warrant against Sonu Sood : अभिनेता सोनू सूदविरोधात अटक वॉरंट जारी, काय आहे प्रकरण? Arrest warrant against Sonu Sood : अभिनेता सोनू सूदविरोधात अटक वॉरंट जारी, काय आहे प्रकरण?](https://c.ndtvimg.com/2025-01/ne61kjig_sonu-sood_625x300_13_January_25.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अडचणीत सापडला आहे. लुथियाना न्यायालयाने सोनू सूदविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. एका फौजदारी खटल्यात साक्षीदार म्हणून अनेक वेळा समन्स बजावल्यानंतरही, न्यायालयात हजर न राहिल्याने गुरुवारी न्यायिक दंडाधिकारी रमणप्रीत कौर यांनी अभिनेता सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा पोलीस स्टेशनला ही समन्स पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
लुधियानाचे वकील राजेश खन्ना यांनी याप्रकरणी खटला दाखल केला आहे. राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला यांच्याविरुद्ध 10 लाख रुपयांच्या फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. वकील राजेश खन्ना यांनी आरोप केला आहे की त्यांना बनावट रिजिका कॉईनमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले.
(नक्की वाचा- Veer Paharia : कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणात 12 जणांवर गुन्हा, वीर पहारियाबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचा राग)
यासोबतच त्यांनी त्यांच्या तक्रारीत इतरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारीअंतर्गत, सोनू सूदला साक्ष देण्यासाठी न्यायालयात बोलावण्यात आले. मात्र वारंवार समन्स बजावल्यानंतरही, सोनू सूद साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर राहिला नाही. त्याच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयाने आता त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.
(नक्की वाचा- वाल्मीक कराडच्या बातम्या का पाहतो? बीडमध्ये तरुणाला बेदम मारलं, डोक्याला जबर मारहाण!)
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, "सोनू सूदविरोधात अनेकदा समन्स जारी करण्यात आले आहे. परंतु तो हजर राहण्यात अयशस्वी झाला आहे. त्यामुळे सोनू सूदला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात येत आहेत." वॉरंट मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे, ज्यामध्ये त्यांना सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world