स्टार प्रवाह वाहिनीवरील महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'ने, अगदी कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. मालिकेतील प्रत्येक पात्राने त्याचे वेगळेपण दर्शवित मालिकेची शोभा वाढवली. गेल्या पाच वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या दरम्यान मालिकेतील प्रत्येक कलाकाराला चाहत्यांकडून भरभरून प्रेम, आपुलकी मिळाली. अर्थात देशमुख कुटुंबीयांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. अखेर पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर, मुग्धा गोडबोले लिखीत आणि रवींद्र कर्माकर दिग्दर्शित, ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.
(नक्की वाचा: अभिषेक बच्चन लाडक्या लेकीच्या बर्थडे पार्टीमध्ये नव्हता? ऐश्वर्या रायने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया)
मालिकेच्या शूटिंगच्या दिवशी कालाकार भावुक झाल्याचं सोशल मीडियावर पहायला. या मालिकेत 'अरुंधती' ही मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री, मधुराणी प्रभुलकरला अक्षरशः अश्रु अनावर झाले. तिने एक सुंदर व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केलाय ज्यामध्ये ती म्हणते," मला या मालिकेमुळे अतिशय सुंदर पात्र साकारायला मिळालं आहे. माझ्या नशिबाने खूप चांगली भूमिका करायला मिळाली. टेलिव्हीजनच्या माध्यामावर इतकं पावरफूल कॅरेक्टर करायला मिळणं आणि तेवढ चांगलं लिहिणं आणि तितकच दर्जेदार दिगदर्शक लाभणं हे खूप क्वचित होतं"
मधुराणीने मालिकेतील लक्षात राहिलेला क्षण सांगितला.. "ज्यावेळी अरुंधती आणि अनिरुद्ध वेगळे झाले तेव्हा अनिरुद्ध म्हणाला, तुझ्या हाताला मसाल्याचा वास येतो मला तु आमडत नाहीस. त्यावेळी हा सिन कशाप्रकारे करावा हे किंवा पॅनिक अटॅकसारखा सिन करणं हा अतिशय सिन्सिअर सिन आहे. त्यामुळे हा सिन माझ्या कायम लक्षात राहण्यासारखा आहे".
(नक्की वाचा: Malaika Arora: मलायका अरोरासोबत आता हा नवीन तरुण कोण? VIDEO VIRAL )
मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांना जवळचं वाटू लागलं होतं. ही टीम नव्हे तर जणू काही कुटुंबच आहे, असे अनेकदा वाटयचे. मालिकेतील प्रत्येक कलाकारांबद्दल अनेक छोट्या-मोठ्या अपडेट सोशल मीडियावर पाहायला मिळायच्या. मात्र यावेळीही मालिकेतील अनेक कलाकारांनी, 'आई कुठे काय करते' या मालिकेचा निरोप घेत असल्याच्या भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.