Aishwarya Rai Abhishek Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. तर काही रिपोर्ट्सनुसार अभिषेकचे अभिनेत्री निमरत कौरसोबत अफेअर सुरू असल्याने या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान अभिषेक किंवा ऐश्वर्यानेही घटस्फोटाच्या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे ऐश्वर्याने लाडकी लेक आराध्याचा 13वा वाढदिवस साजरा केला. आराध्याचा वाढदिवस 16 नोव्हेंबरला होता, पण ऐश्वर्याने सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर 20 नोव्हेंबरला शेअर केले. हे फोटो व्हायरल होत आहेत. आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे एकाही फोटोमध्ये अभिषेक बच्चन दिसत नाहीय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
(नक्की वाचा:अभिषेक बच्चनपूर्वी जोडीदार म्हणून हा व्यक्ती निवडण्याची ऐश्वर्याची होती इच्छा, नाव ऐकून बसेल धक्का)
वडील आणि लेकीला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
ऐश्वर्याने रायने लेक आराध्या आणि दिवंगत वडील कृष्णाराज राय यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली, ज्यातील एक फोटोमध्ये आराध्या तिच्या आजोबांच्या फोटोसमोर नमन करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये आराध्या, ऐश्वर्या आणि ऐश्वर्याची आई देखील दिसत आहे. पोस्टमध्ये आराध्याचे काही बालपणीचे फोटोही शेअर करण्यात आले आहेत.
अभिषेक बच्चन फोटोमधून गायब
कॅप्शनमध्ये ऐश्वर्या रायने वडील आणि आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण फोटोमध्ये अभिषेक बच्चन किंवा त्याच्या कुटुंबातील एकही व्यक्ती नसल्याचे चाहत्यांच्या लक्षात आले. एका युजरने लिहिलं की, अभिषेक कुठे आहे?. तर आणखी एका युजरने म्हटलंय की, 'अमिताभ बच्चन यांचे कुटुंब नाही आणि ज्युनिअर एबी देखील फोटोमध्ये दिसत नाहीय'. ऐश्वर्या रायच्या या नव्या सोशल मीडियावर पोस्टमुळे पुन्हा एकदा तिच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
(नक्की वाचा: अभिषेक बच्चनसोबत अफेअरची चर्चा, निमरत कौरने कन्फर्म केले तिचे रिलेशनशिप स्टेटस; म्हणाली...)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world