
Nilesh Sable News: स्टार प्रवाहचा लोकप्रिय कार्यक्रम 'शिट्टी वाजली रे'चा महाअंतिम सोहळा 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्टला जल्लोषात रंगणार आहे. महाअंतिम सोहळ्यात सेलिब्रिटी जोड्यांची धमाल अनुभवता येईलच पण खास आकर्षण ठरणार आहे ते निलेश साबळे (Nilesh Sable News) आणि सिद्धार्थ जाधवची हजेरी. सिद्धार्थ जाधवचा (Siddharth Jadhav) 'आता होऊ दे धिंगाणा' (Aata Hou De Dhingana 4) कार्यक्रम चौपट मनोरंजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तर निलेश साबळे 'शिट्टी वाजली रे'च्या संपूर्ण टीमचं कौतुक करण्यासाठी आणि खास पदार्थांची चव चाखण्याकरिता महाअंतिम सोहळ्यात हजेरी लावणार आहे.
पहिला कार्यक्रम असल्याने प्रचंड उत्सुक: निलेश साबळे
स्टार प्रवाहसोबतचा हा पहिला कार्यक्रम असल्यामुळे निलेश साबळेही (Nilesh Sable News) प्रचंड उत्सुक आहे. शिट्टी वाजली रे च्या मंचावरच्या या अनुभवाविषयी सांगताना निलेश साबळे (Nilesh Sable News) म्हणाला, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबतचा हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे. स्टार प्रवाहचे अनेक कार्यक्रम मी पाहत आलोय. आता होऊ दे धिंगाणा आणि शिट्टी वाजली रे हे दोन्ही कार्यक्रम माझ्या आवडीचे आहेत. स्टार प्रवाहने इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने जेव्हा या कार्यक्रमासाठी विचारलं तेव्हा नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं. शिट्टी वाजली रे च्या मंचावरचा दिवस माझ्यासाठी अतिशय गंमतीदार ठरला. मला स्वयंपाक बनवता येत नाही पण माझ्यासोबत अभिनेत्री सुपर्णा श्याम होती. त्यामुळे तिच्या साथीने मी पदार्थ बनवू शकलो. स्टार प्रवाहच्या कुटुंबात माझा प्रवेश झालाय त्यामुळे अतिशय आनंद होतोय.'
निलेश साबळे महाअंतिम सोहळ्यामध्ये प्रेक्षकांचे कशा पद्धतीने मनोरंजन करत आहेत, हे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
(नक्की वाचा: Nilesh Sable: चला हवा येवू द्या मधून डच्चू की हाकालपट्टी? डॉ. निलेश साबळे थेटच बोलले)
निलेश साबळे आणि ‘चला हवा येऊ द्या' वाद: काय आहे खरं कारण?
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात डॉ. निलेश साबळे दिसणार नसल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. यादरम्यान राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे या चर्चेला नवे वळण प्राप्त झाले होते. त्यांनी निलेश साबळेंच्या डोक्यात ‘हवा गेली' आणि सेटवर त्यांचा अपमान झाल्याचा आरोप केला. तसेच झी मराठीने साबळेंना ‘डच्चू' दिल्याचंही म्हटलं. या आरोपांमुळे हा वाद चांगलाच तापला होता.
(नक्की वाचा : Chala Hawa Yeu Dya 2: निलेश साबळे डोक्यात हवा गेलेला माणूस; शरद उपाध्ये यांनी लिहिली लांबलचक पोस्ट)
निलेश साबळेने दिले होते स्पष्टीकरण
निलेश साबळेने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिलं. त्याने स्पष्ट केलं की, झी मराठीने त्यांना काढून टाकलेलं नाही, तर त्यांनी स्वतःच या पर्वात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण सांगताना साबळेने सांगितलं की, सध्या ते एका सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत आणि पुढील दीड महिने त्यांचं शेड्यूल अतिशय व्यस्त आहे. त्यामुळे ‘चला हवा येऊ द्या'साठी तारखा देणं त्यांना शक्य झालं नाही. यामुळे त्यांनी स्वतःहून माघार घेण्याची विनंती केली होती. याचा अर्थ असा नाही की त्यांना कार्यक्रमात रस नव्हता किंवा त्यांनी नकार दिला, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, या चित्रपटात भाऊ कदमही असून त्यामुळे तेही या पर्वात दिसणार नसल्याचं साबळे यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world