जाहिरात

Nilesh Sable And Bhau Kadam: दिवाळी मुहूर्तावर निलेश साबळे-भाऊ कदम घेऊन येणार काहीतरी भन्नाट, कुठे आणि केव्हा?

Nilesh Sable And Bhau Kadam: डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम यांच्या अफलातून जुगलबंदीने प्रेक्षकांना दिवाळीमध्ये मनोरंजनाचा बोनस मिळणार आहे.

Nilesh Sable And Bhau Kadam: दिवाळी मुहूर्तावर निलेश साबळे-भाऊ कदम घेऊन येणार काहीतरी भन्नाट, कुठे आणि केव्हा?
"Nilesh Sable And Bhau Kadam: निलेश साबळे आणि भाऊ कदम जोडी पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला"

Nilesh Sable And Bhau Kadam: सणांची मजा तेव्हा द्विगुणीत होते जेव्हा संपूर्ण परिवार एकत्र येतो. गणेशोत्सव जल्लोषात साजरा केल्यानंतर आता स्टार प्रवाह परिवार ढिंचॅक दिवाळी सण (Diwali 2025) साजरी करण्यासाठी सज्ज झालाय. फराळा इतकाच खमंग कॉमेडीचा तडका (New Marathi Comedy Show) आणि फटाक्यांच्या आतषबाजीप्रमाणे कलाकारांचे लखलखते परफॉर्मन्स दिवाळी विशेष कार्यक्रम अधिक रंगत आणणार आहेत. स्टार प्रवाहच्या (Star Pravah Channel) परिवारासोबतच ही नवी जोडी यंदाची दिवाळी गाजवणार आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधून खळखळून हसवण्यासाठी येणार आहेत, महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर अर्थातच निलेश साबळे आणि भाऊ कदम. 

निलेश साबळे-भाऊ कदमची जोडी पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक

निलेश साबळे (Nilesh Sable) आणि भाऊ कदम (Bhau Kadam) यांना एकत्र पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक होता. अखेर ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी (Star Pravah Channel Dhinchak Diwali) कार्यक्रमाच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकत्र येतेय. प्रेक्षकांप्रमाणेच भाऊ कदम  (Bhau Kadam Latest News) आणि निलेश साबळे (Nilesh Sable News) देखील या कार्यक्रमासाठी प्रचंड उत्सुक आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Star Pravah Channel

भूमिकेचे सोनं करणारा नट लेखकाला हवा असतो, निलेश साबळेंकडून भाऊ कदमचं कौतुक

नव्या कार्यक्रमाविषयी सांगताना डॉ. निलेश साबळे म्हणाले, "खूप दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत होते. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मी आणि भाऊ कदम स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी कार्यक्रमात काहीतरी भन्नाट घेऊन येतोय. भाऊसोबत काम करताना नेहमीच मजा येते. भाऊला मी कळलोय आणि मला भाऊ कळलाय असं म्हटलं तरी चालेल. गेली 15 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. भूमिकेचं सोनं करणारा नट लेखकाला हवा असतो. भाऊ कदमचं पण काहीसं असंच आहे. प्रत्येक भूमिकेचं तो सोनं करतो. या कार्यक्रमातही प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजन असेल" अशी भावना निलेश साबळे यांनी व्यक्त केली.

(नक्की वाचा: Surekha Kudachi News: 'त्याक्षणी मी खूप खचले, पदरात अडीच वर्षांची मुलगी आणि पतीचे निधन', सुरेखा कुडचींचा संघर्षमय प्रवास)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Star Pravah Channel

दिवाळीला हास्याचा फराळ: भाऊ कदम 

भाऊ कदम म्हणाले, "यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने ढिंचॅक असणार आहे. स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदा काम करतोय त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. निलेश साबळेसोबत इतक्या वर्षांची मैत्री आहे. हीच मैत्री निराळ्या ढंगात प्रेक्षकांसमोर येईल. दिवाळीला हास्याचा फराळ प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत, तेव्हा पाहायला विसरु नका ढिंचॅक दिवाळी रविवार 12 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.'

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Star Pravah Channel

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com