Rajinikanth Hospitalised: सुपरस्टार रजनीकांत चेन्नईतील अपोला हॉस्पिटलमध्ये दाखल

Rajinikanth Hospitalised: सुपरस्टार रजनीकांत यांना सोमवारी (30 सप्टेंबर) उशीरा रात्री चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

Rajinikanth Hospitalised:  सुपरस्टार रजनीकांत यांना सोमवारी (30 सप्टेंबर) उशीरा रात्री चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, हृदयाशी संबंधित वैद्यकीय तपासणी मंगळवारी (1 ऑक्टोबर) करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रजनीकांत यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान हॉस्पिटल प्रशासन किंवा कुटुंबातील सदस्यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.  

(नक्की वाचा: Dadasaheb Phalke Award : आतापर्यंत दादासाहेब फाळके पुरस्कार किती मराठी कलाकारांना मिळाला?)

रजनीकांत या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त

73 वर्षीय रजनीकांत सध्या दोन मोठ्या सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. दिग्दर्शक ज्ञानवेल राजा यांचा 'वेट्टैयान' सिनेमा 10 ऑक्टोबरला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. तर लोकेश कनगराज यांचा 'कुली' सिनेमाचे शुटिंग करून रजनीकांत काही दिवसांपूर्वीच चेन्नईमध्ये परतले आहेत. यानंतर लगेचच त्यांना सिनेमाचे प्रमोशन करण्यास सुरुवात करायची होती. 

(नक्की वाचा: SRKनंतर अ‍ॅटली आता सलमान खानसोबत करणार ब्लॉकबस्टर सिनेमा, कमल हासन दिसणार प्रमुख भूमिकेत?)

10 वर्षापूर्वी झाली होती ही शस्त्रक्रिया

दरम्यान जवळपास 10 वर्षांपूर्वी सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर सिंगापूरमध्ये किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अलीकडेच प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी राजकारणातून माघार घेतली होती. यानंतर ते पुन्हा सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त झाले. 

थलायवा म्हणून प्रसिद्ध असणारे रजनीकांत यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत आणि असंख्य प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अप्रतिम अभिनय कौशल्य आणि हटके स्टाइल यामुळे त्यांची स्वतंत्र अशी एक ओळख निर्माण झाली आहे. टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही त्यांच्या चाहत्यांची संख्या भलीमोठी आहे.