Atlee Salman Khan Kamal Haasan Movie: वर्ष 2023मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'जवान' (Jawan) सिनेमाने शाहरुख खानला (Shah Rukh Khan) पुन्हा एकदा बॉलिवूडचा बादशाह बनवले. या सिनेमाने 1100 कोटी रुपयांची कमाई केली आणि अॅटली कुमार (Atlee)-किंग शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जोडी सुपरहिट ठरली. 'जवान' सिनेमानंतर आता अॅटली बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत (Salman Khan) आणखी एक सुपरहिट सिनेमा देण्याची तयार करत असल्याची माहिती समोर येत आहे. तूर्तास या सिनेमाचे नाव #Atlee6 असे देण्यात आले आहे.
#Atlee6 - With being #SalmanKhan almost confirmed for #Atlee's next movie, he has been in Final talks with Ulaganayagan #KamalHaasan to rope in for the movie, as it's duel hero Subject 🌟🌟
— AmuthaBharathi (@CinemaWithAB) September 30, 2024
Going to be a Proper Mega Pan Indian reunion 🔥
An Anirudh Musical 🎶 pic.twitter.com/KRRWEFLypP
(नक्की वाचा: धर्मवीर-2 च्या कथानकातील राज ठाकरेंची एन्ट्री ठरणार वादाचं कारण? चित्रपटात नक्की काय दाखवलंय?)
सिनेमाचे शुटिंग कधीपासून होणार सुरू?
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान अॅटली कुमारच्या सिनेमाचे शुटिंग जानेवारी 2025पासून करणार आहे. दुसरीकडे साऊथ सुपरस्टार कमल हासन देखील सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान कमल हासन यांच्यासोबत अॅटलीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. तर अनिरुद्ध रविचंदर या सिनेमासाठी संगीत दिग्दर्शन करणार आहे.
(नक्की वाचा: अमिताभ बच्चन सून ऐश्वर्या रायकडं दु्र्लक्ष करतात? 'त्या' चर्चेला अभिनेत्रीनं दिलं उत्तर)
चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस
अॅटलीच्या नव्या सिनेमाबाबतची माहिती समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले आहे की, 'थिएटरमध्ये यावेळेही फटाके फुटणार आहेत'. सिनेमाचे नाव तरी सांगा, अशी विचारणा दुसऱ्या युजरने केलीय.
(नक्की वाचा: उर्मिला मातोंडकरच्या घटस्फोटाची चर्चा! कोण आहे तिचा नवरा मोहसीन अख्तर मीर?)
'जवान' सिनेमाने केली रेकॉर्डब्रेक कमाई
दरम्यान 'जवान' सिनेमा जपान देशामध्ये रिलीज झाला आहे. IMDBच्या माहितीनुसार 'जवान' सिनेमाचे बजेट जवळपास 300 कोटी रुपये इतके होते आणि सिनेमाने बॉक्सऑफिसवर 1152 कोटी रुपयांची कमाई केली. सिनेमामध्ये शाहरुख खान आणि नयनतारा यांची प्रमुख भूमिका होती. तर विजय सेतुपतीने सिनेमामध्ये खलनायकाची भूमिका साकारली.
सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा
दुसरीकडे सलमान खान सध्या एआर मुरूगदास यांच्या 'सिकंदर' सिनेमाच्या चित्रिकरणामध्येही व्यस्त आहे. या सिनेमामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल आणि अभिनेता शर्मन जोशी यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world