जाहिरात

Dadasaheb Phalke Award : आतापर्यंत दादासाहेब फाळके पुरस्कार किती मराठी कलाकारांना मिळाला?

भारत सरकारने 1969 साली दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यास सुरुवात केली. 

Dadasaheb Phalke Award : आतापर्यंत दादासाहेब फाळके पुरस्कार किती मराठी कलाकारांना मिळाला?
मुंबई:

ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती (Veteran actor Mithun Chakraborty) यांना शासनाकडून अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना शासनाकडून अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांनी महाराष्ट्रात चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. दादासाहेबांची 1913 साली हरिश्चंद्राची फॅक्टरी नावाचा पहिला भारतीय मूकपट तयार केला. त्यांच्या अफाट कामामुळे आज भारतात चित्रपट रोवला असं म्हटलं जातं. त्यामुळे भारत सरकारने 1969 साली दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यास सुरुवात केली. 

गेल्या 53 वर्षांपासून चित्रपटक्षेत्रातील विविध विभागातील दर्जेदार करणाऱ्या कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात येतंय. इंडिया टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार 1969 पासून आतापर्यंत 53 जणांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव करण्यात आली आहे. यामध्ये मराठी कलाकारांची संख्या मात्र हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकीच आहे.

किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' ऑस्करच्या शर्यतीत, रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'सह 29 चित्रपटांना टाकलं मागे

नक्की वाचा - किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' ऑस्करच्या शर्यतीत, रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'सह 29 चित्रपटांना टाकलं मागे

आतापर्यंत 2000 (48th) आशा भोसले, 1991 (39th) बालाजी पेंढारकर, 1989 (37th) लता मंगेशकर, 1985 (33rd)व्ही शांताराम, 1983 (31st) दुर्गा खोटे यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. मात्र इतर भाषेतील कलाकारांच्या संख्येत हा आकडा खूप लहान आहे.  देशात चित्रपट रुजवणाऱ्या मराठी माणसाच्या नावाने मिळणारा पुरस्कार स्वीकारणाऱ्या मराठी कलाकारांची संख्या इतकी कमी का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.     

दादासाहेब फाळके पुरस्काराची यादी - 
2021 (71st)    वहिदा रेहमान  Hindi
2020 (70th)    आशा पारेख    Hindi
2019 (67th)    रजनीकांत      Tamil
2018 (66th)    अमिताभ बच्चन    Hindi
2017 (65th)    विनोद खन्ना    Hindi
2016 (64th)    के. विश्वनाथ     Telugu
2015 (63rd)    मनोज कुमार    Hindi
2014 (62nd)   शशी कपूर     Hindi
2013 (61st)    गुलजार          Hindi
2012 (60th)    प्राण              Hindi
2011 (59th)    सौमित्र चॅटर्जी     Bengali
2010 (58th)    के. बालचंदर     Tamil, Telugu
2009 (57th)    डी. रामानायडू    Telugu
2008 (56th)    वी.के.मूर्ती     Hindi
2007(55th)     मन्ना डे           Bengali, Hindi
2006 (54th)    तपन सिन्हा     Bengali, Hindi
2005 (53rd)    श्याम बेनेगन     Hindi
2004 (52nd)   अदूर गोपालकृष्णन    Malayalam
2003 (51st)    मृणाल सेन     Bengali
2002 (50th)    देव आनंद      Hindi
2001 (49th)    यश चोप्रा       Hindi
2000 (48th)    आशा भोसले    Hindi, Marathi
1999 (47th)    ऋषिकेश मुखर्जी     Hindi
1998 (46th)    बी.आर.चोप्रा    Hindi
1997 (45th)    कवी प्रदीप     Hindi
1996 (44th)    शिवाजी गानेसन    Tamil
1995 (43rd)    राजकुमार      Kannada
1994 (42nd)   दिलीप कुमार     Hindi
1993 (41st)    मजरूह सुलतानपुरी    Hindi
1992 (40th)    भुपेंद्र हजारिका           Assam
1991 (39th)    भालजी पेंढारकर     Marathi
1990 (38th)    अकिनेनी नागेश्वरा राव    Telugu
1989 (37th)    लता मंगेशकर     Hindi, Marathi
1988 (36th)    अशोक कुमार     Hindi
1987 (35th)    राज कपूर       Hindi
1986 (34th)    बी. नागी रेड्डी     Telugu
1985 (33rd)    व्ही शांताराम    Hindi, Marathi
1984 (32nd)   सत्यजित राय     Bengali
1983 (31st)    दुर्गा खोटे         Hindi, Marathi
1982 (30th)    एल. व्ही. प्रसाद  Hindi, Tamil, Telugu
1981 (29th)    नौशाद             Hindi
1980 (28th)    पैडी जयराज     Hindi, Telugu
1979 (27th)    सोहराब मोदी    Hindi
1978 (26th)    रायचंद बोराल   Bengali, Hindi
1977 (25th)    नितीन बोस     Bengali, Hindi
1976 (24th)    कानन देवी      Bengali
1975 (23rd)    धीरेंद्रनाथ गांगुली    Bengali
1974 (22nd)   बोमीरेड्डी नरसिंह रेड्डी     Telugu
1973 (21st)    रुबी मायर्स (सुलोचना)  Hindi
1972 (20th)    पंकज मुळीक    Bengali & Hindi
1971 (19th)    पृथ्वीराज कपूर   Hindi
1970 (18th)    बिरेंद्रनाथ सरकार     Bengali
1969 (17th)    देविका राणी     Hindi

Previous Article
SRKनंतर अ‍ॅटली आता सलमान खानसोबत करणार ब्लॉकबस्टर सिनेमा, कमल हासन दिसणार प्रमुख भूमिकेत? 
Dadasaheb Phalke Award : आतापर्यंत दादासाहेब फाळके पुरस्कार किती मराठी कलाकारांना मिळाला?
Actor Rajinikanth hospitalised Apollo Hospital in Chennai
Next Article
Rajinikanth Hospitalised: सुपरस्टार रजनीकांत चेन्नईतील अपोला हॉस्पिटलमध्ये दाखल