Sarang Sathaye And Paula Marriage: अभिनेता सारंग साठेने त्याची गर्लफ्रेंड पॉलासोबत लग्नगाठ बांधली आहे. 28 सप्टेंबर रोजी परदेशामध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडला. दोन्ही कुटुंबातील जवळचे नातेवाईक आणि खास मित्रपरिवार लग्नसोहळ्यासाठी उपस्थित होतं. सारंगने लग्नसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्याने खास कॅप्शनही दिलंय.
सारंग साठेने शेअर केले लग्नाचे फोटो
लग्नाचे फोटो शेअर करत सारंग साठेने कॅप्शनमध्ये म्हटलंय, की, "हो आम्ही लग्न केले! लग्न आमच्यासाठी कधीच प्राधान्याची गोष्ट नव्हती, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. पण एकमेव गोष्ट जी आम्हाला वेगळं ठेवत होती ती म्हणजे कागदाचा तुकडा. मागील वर्ष कठीण होते. पहिल्यांदाच आम्हाला विभक्त होण्याची भीती वाटत होती. पण प्रेम कायमच द्वेषावर विजय मिळवतं. आमचे प्रेम आणि मैत्री अबाधित ठेवण्यासाठी आम्ही काल, 28/09/2025 तो कागद मिळवला. लग्नाला आमचे जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते. आमच्या कुटुंबांना एकत्र आणण्याची ही एक उत्तम संधी आहे. आम्ही एकमेकांना गोष्टी सांगितल्या, गाणी गायली आणि एकमेकांना वचन दिले की आम्ही जसे आहोत तसेच प्रेमी आणि बेस्ट मित्र राहण्याचा प्रयत्न करू! तर ही आमची छोटीशी कहाणी आहे! प्रेम नेहमीच जिंकेल!"
(नक्की वाचा: गणोजी म्हणून लक्ष्मण उतेकरांनी का कास्ट केले? सारंगने सांगितली Inside Story)
सारंग आणि पॉलाचे खास फोटो
लग्नसोहळ्यापूर्वी सारंग साठे आणि पॉलाने काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. पण हे दोघं लग्न करणार आहेत की नवा प्रोजेक्टच्या घोषणा? यावरुन चाहत्यांना गोंधळ उडाला होता. कारण दोघांनीही लग्नाची स्पष्टपणे माहिती दिली नव्हती.
(नक्की वाचा: Exclusive : "पुण्याचं टाऊन प्लानिंग म्हणजे..."; पुण्याच्या वाहतूक कोंडीवर सारंग साठेची 'जगात' भारी' कमेंट)