जाहिरात

Exclusive : "पुण्याचं टाऊन प्लानिंग म्हणजे..."; पुण्याच्या वाहतूक कोंडीवर सारंग साठेची 'जगात' भारी' कमेंट

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता सारंग साठे याने देखील पुण्याच्या ट्रॅफिकवर मिश्किल टिप्पणी केली आहे. NDTV मराठीशी खास बातचित करताना सारंगने पुण्याच्या टाऊन प्लानिंगवर प्रश्न उपस्थित केला आहे. 

Exclusive : "पुण्याचं टाऊन प्लानिंग म्हणजे..."; पुण्याच्या वाहतूक कोंडीवर सारंग साठेची 'जगात' भारी' कमेंट

संजय तिवारी, NDTV मराठी

पुणे आणि वाहतूक कोंडी हे जणू समीकरणंच बनलं आहे. पुण्यातील कुठल्याही कोपऱ्यात गेलं की वाहतूक कोंडी मिळणार नाही, असं होत नाही. पुणेकर आणि पुण्याबाहेरून येणाऱ्यांनाही आता पुण्याच्या ट्र्रफिकची सवय झाली आहे. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता सारंग साठे याने देखील पुण्याच्या ट्रॅफिकवर मिश्किल टिप्पणी केली आहे. NDTV मराठीशी खास बातचित करताना सारंगने पुण्याच्या टाऊन प्लानिंगवर प्रश्न उपस्थित केला आहे. 

सारंगने म्हटलं की, "पुण्यातील वाहतूक ही वाहत नाही तर तुंबलेली आहे. पुण्यातील वाहतुकीवर कॉमेडी करण्याची गरज नाही. पुण्याचं टाऊन प्लानिंग जे करतात ते स्वत: स्टँडअप कॉमिक आहेत, असं वाटावं असं त्यांचं टाऊन प्लानिंग सुरु आहे. माझा एक फेमस जोक आहे. जो मी अनेकदा केला आहे की, चांदणी चौकात जात असतो तेव्हा गूगलला विचारायचं की कोथरुडला जायचंय. तर गूगल सांगतं की 'Go ahed and take a 'ळ''. म्हणजे गूगलला देखील सांगता येत नाही आणि तोही म्हणतो की गोल गोल फिरत राहा."

(नक्की वाचा-  Gautami Patil : गौतमीने साजरा केला 'खास' लोकांसोबत वाढदिवस, कोण आहेत ही मंडळी?)

वाहतुकीचे नियम पाळा

"पुण्यात वाहतूक कोंडीची जी समस्या आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे शहरी विकास विचार न करता केला जातो आहे. शहरं नुसती वाढवणे उपाय नाही. त्याचं प्लानिंग करणे गरजेचं आहे. नुसतं प्रशासनावर आरोप करणं चुकीचं आहे. नागरिक म्हणून आपली देखील तेवढीच जबाबदारी आहे. मी स्वत: वाहतुकीचे नियम पाळतो आणि नागरिकांनी देखील वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत", असं आवाहन देखील सारंगने सर्वांना केले आहे. 

प्रणित मोरेला झालेल्या मारहाणीचा निषेध

कॉमेडियन प्रणित मोरेला झालेल्या मारहाणीबाबत बोलताना सारंगने म्हटलं की, "आपल्या मनात नेहमी काहीतरी राग असतो. आपल्याला सतत वाटत असतं की काही वाईट सुरु आहे. अनेक राजकारण्यांच्या अनुषंगाने आमच्यासोबत देखील अशा गोष्टी घडल्या आहे. आमच्यावर बंदी घातली गेली किंवा काहीतरी अशाच प्रकारे झालं. मात्र त्या राजकारण्यांशी बोललं की त्यांना याची काही पडलेली नसते." 

(नक्की वाचा- बॉलिवूड प्रेम पडलं महागात; माजी मुख्यमंत्र्यांच्या देखण्या मुलीला 4 कोटींचा चुना)

कलाकारांचंव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यात महत्त्वाचं

"त्रास जो असतो तो कार्यकर्त्यांना असतो. कारण कार्यकर्त्यांना देखील पायऱ्या चढायच्या असतात. त्यांच्याही मनात राग असतो. तो त्यांना कुठेतरी दाखवायचा असतो. त्या रागापोटी हे होते. मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो. कलाकारांचं व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. मात्र हे घडत राहणार, याआधीही घडलं आहे. आमच्याही ऑफिसबाहेर सिक्युरिटी गार्ड आहे. आम्हालाही धमक्या येत राहतात", असं सारंगने म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: