अंत्यसंस्कार, तेराव्यात जाण्याचेही घेतात पैसे; अभिनेत्याकडून बॉलिवूडचं डार्क सिक्रेट उघड 

बॉलिवूडचे कलाकार अंत्यसंस्काराला जाण्यासाठीही पैसे घेत असल्याचं तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया बॉलिवूडच्या डार्क सिक्रेटबद्दल...

Advertisement
Read Time: 1 min
मुंबई:

चित्रपटातील कलाकारांनी चित्रपटांव्यतिरिक्त इतर ठिकाणी पाहणं चाहत्यांसाठी सरप्राइज असतं. त्यामुळे चित्रपटांशिवाय इतर ठिकाणी सेलिब्रिटींना पाहणं चाहत्यांना आवडतं. एका चित्रपटात काम करण्यासाठी कलाकार कोट्यवधी पैसे आकारतात. मात्र वर्षाचे एक किंवा दोन चित्रपटातून येणारे पैसे कलाकारांसाठी पुरेसे नसतात. त्यामुळे चित्रपटांव्यतिरिक्त सेलिब्रिटी एखाद्या ब्रँडच्या पब्लिसिटीच्या कामातून चांगली कमाई करतात.

एका जाहिरातीसाठी ते लाखो-कोटी रुपये आकारतात. इतक्या पैशांतूनच ते लग्झरी आयुष्य जगू शकतात. याशिवाय कलाकार विविध व्यावसायिकांच्या लग्नात डान्स कार्यक्रम करतात. एका डान्ससाठी ते चांगले पैसे घेतात. मात्र हे कलाकार अंत्यसंस्काराला जाण्यासाठीही पैसे घेत असल्याचं तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया बॉलिवूडच्या डार्क सिक्रेटबद्दल...

हे ही वाचा-अभिनेत्री शिल्पा शेट्टी-राज कुंद्राची 98 कोटींची संपत्ती जप्त; जुहूचा फ्लॅट, पुण्याचा बंगलाही ताब्यात

बॉलिवूड सेलिब्रिटी लग्नात डान्स करण्याचे पैसे घेत असल्याचं आपण जाणतो. याशिवाय लग्नात उपस्थिती दर्शविण्याचेही पैसे घेतले जातात. बिग स्मॉल टॉक नाओ शो मध्ये बॉलिवूडमधील डार्क सिक्रेटचा खुलासा करण्यात आला. अनुजने या कार्यक्रमात  सांगितलं की, मोठ्या कलाकारांची एक इनमक वेगवेगळ्या लग्नातील उपस्थिती आणि डान्स कार्यक्रमातून होते. ते लग्नात जातात आणि डान्स करतात. दुसरी कमाई अंत्यसंस्कारातून आणि तेराव्यातून येते. याबाबत लोकांना माहिती नसेल. फारच कमी जणांना याबद्दल माहिती असेल. कलाकार असं काही करीत असतील याचा कोणी विचारही करू शकत नाही. 

Advertisement

या व्हिडिओवर चाहत्यांकडे विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी कलाकारांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली आहे.