अंमलबजालणी संचालनालयाकडून (ED) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची 97 कोटींची संपत्ती 18 एप्रिल रोजी जप्त करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या संपत्तीमध्ये राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीचा जुहू येथील फ्लॅट, आणि पुण्यातील बंगल्याचा समावेश आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची मुंबई, पुण्यातील फ्लॅट, इक्विटी शेअर आणि 98 कोटींचे शेअर जप्त केले आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या संपत्तीत जुहू येथील निवासी फ्लॅट सामील असून तो सध्या शिल्पा शेट्टीच्या नावावर आहे. याशिवाय पुण्यातील राहता बंगला आणि राज कुंद्रा याच्या नावावर असलेल्या इक्विटी शेअरचा समावेश आहे.
तपास एजन्सीने काय सांगितलं?
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 97.79 कोटींची संपत्ती जप्त करण्यासाठी PMLA च्या नियमांअंतर्गत अस्थायी जप्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
हे प्रकरण व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी, दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि अनेक एजंटविरोधात महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या FIR मधून समोर आला आहे. या FIR मधील आरोपानुसार, या लोकांनी बिटकॉइनच्या माध्यमातून प्रति महिना 10 टक्के परतावा देण्याच्या खोट्या दाव्यासह सर्वसाधारण जनतेकड़ून बिटकॉइन ( 2017 मध्ये 6,6000 कोटी मूल्य) च्या रुपात मोठ्या संख्येने पैसे जमा केले होते.
हे ही वाचा-सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, मोठा खुलासा, आणखी एक संशयित ताब्यात!
ईडीने आरोप केला आहे की, कुंद्राने युक्रेनमध्ये एक बिटकॉइन मायनिंग फार्मसाठी गेन बिटकॉइन पोंजीचे मास्टरमाइंड आणि प्रोमोटर अमित भारद्वाजकडून 285 बिटकॉइन घेतले. ED ने दिलेल्या माहितीनुसार कुंद्राजवळ आता 285 बिटकॉइन आहेत, ज्याची किंमत सध्या 150 कोटींहून अधिक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world