Riteish Deshmukh Genelia D'souza : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांच्या जोडीवर सर्वच फिदा आहेत. या दोघांना पाहिल्यानंतर प्रत्येकाला हेच वाटते की आपलाही जोडीदार इतकाच प्रेमळ आणि जीवन असेच मनमोकळपणाने जगणार हवा. या दोघांची प्रत्येक गोष्ट लक्ष वेधणारी असते. सोशल मीडियावरही जिनिलिया आणि रितेशचे कित्येक गंमतीशीर तसेच रोमँटिक व्हिडीओ पाहायला मिळतात. पण रितेशने जिनिलियासोबत ब्रेकअप केले होते हे तुम्हाला माहितीय का? नाही म्हणता... तर या दोघांच्या जीवनात घडलेला कॉमेडी पण तितकाच गंभीर किस्सा जिनिलियाने एका पॉडकास्ट शोदरम्यान सांगितला. रितेशने जिनिलियासोबत कधी प्रँक केले होते? असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळेस अभिनेत्रीने लग्नापूर्वी घडलेली एक घटना सांगितली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रितेशने जिनिलिया पाठवला ब्रेक अपचा मेसेज
श्रेया घोडावतच्या पोडकास्ट शोमध्ये जिनिलियाने सांगितले की,"जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. त्यावेळेस रितेशने एप्रिल फूल प्रँक केला. 'आपले नाते संपले' असा मेसेज रितेशने मला रात्री उशीरा 1 वाजता पाठवला. मेसेज पाठवून तो झोपी गेला. पहाटे 2.30 वाजता मी मेसेज वाचला आणि उदास झाले. नेमके काय झालंय मला कळेना. असे कसे कोण वागू शकते? असा विचार मी करू लागले.
(नक्की वाचा: नीतू कपूरनं केलं आलिया भटकडे दुर्लक्ष, 'ती' आई म्हणून हाक मारत होती पण..Video Viral)
जिनिलिया रितेशवर झाली नाराज...
जिनिलियाने पुढे असेही सांगितले की, सकाळी 9 वाजेपर्यंत मी अस्वस्थ होते. तो सकाळी उठला आणि रात्री आपण काय केलंय हे त्याच्या लक्षातच नव्हते. सकाळी त्याने मला फोन केला आणि काय करतेयस? असे विचारले. यावर मी रितेशला म्हटलं की मला वाटत नाही की आपण बोलले पाहिजे. मला तुझ्याशी बोलायचं नाहीय.
(नक्की वाचा: 'करिश्मा का करिश्मा' फेम अभिनेत्री झनक शुक्लाने केले लग्न)
यावर रितेशने विचारलं, नेमके काय झालंय? पुढे मी म्हटलं की, तू असे वागतोयस जसं काही झालेच नाहीय? यानंतर जिनिलियाने त्याला ब्रेकअपच्या मेसेजबाबत सांगितले, तेव्हा रितेशला आठवले. त्यावर तो एक एप्रिल फूल प्रँक होता, असे रितेशने स्पष्ट केले. नात्याबाबत अशी मस्करी कोण करते, असा प्रश्नही त्यावेळेस जिनिलियाने रितेशला केल्याचे सांगितले.
रितेश देशमुख आणि जिनिलियाने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. बॉलिवूडमधील क्युट कपल म्हणून रितेश-जिनिलियाची जोडी प्रसिद्ध आहे.