जाहिरात

नीतू कपूरनं केलं आलिया भटकडे दुर्लक्ष, 'ती' आई म्हणून हाक मारत होती पण..Video Viral

महान चित्रपट अभिनेते तसंच निर्माते-दिग्दर्शक राज कपूर यांची 100 वी जयंती गेल्या आठवड्यात (14 डिसेंबर) साजरी झाली. या निमित्तानं संपूर्ण कपूर परिवार एका कार्यक्रमासाठी एकत्र आला होता.

नीतू कपूरनं केलं आलिया भटकडे दुर्लक्ष, 'ती' आई म्हणून हाक मारत होती पण..Video Viral
आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
मुंबई:

महान चित्रपट अभिनेते तसंच निर्माते-दिग्दर्शक राज कपूर यांची 100 वी जयंती गेल्या आठवड्यात (14 डिसेंबर) साजरी झाली. या निमित्तानं संपूर्ण कपूर परिवार एका कार्यक्रमासाठी एकत्र आला होता. मुंबईत राज कपूर फिल्म फेस्टिव्हलसाठी कपूर परिवार एकत्र आला होता. रेड कार्पेट इव्हेंटनं तीन दिवसांच्या या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राज कपूर यांचे 10 प्रसिद्ध चित्रपट दाखवण्यात आले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या कार्यक्रमात रणबीर कपूरनं काळ्या रंगाचा चेष्मा घातला होता. त्यानं पुढील सिनेमा लव्ह अँड वॉरच्या निमित्तानं मिशी ठेवल्या आहेत. रणबीरचा हा लुक फॅन्सना आवडला. तो पाहून अनेकांना रणबीरचे आजोबा आठवले. तर त्याची पत्नी आलिया भटनं फुलांची सब्यासाची साडी घातली होती. आलीया या साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. या कार्यक्रमात बरीच मजा-मस्ती झाली. पण, या कार्यक्रमातील एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये कपूर परिवारातील थोडा तणाव दिसत होता. 

( नक्की वाचा : Allu Arjun Story : फ्लॉवर नाही फायर ! लाजरा मुलगा कसा बनला सर्वात मोठा 'स्टायलिश स्टार' )

या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या वेगानं व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली असून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आलीया भट ही नीतू कपूरच्या जवळ जाऊन त्यांना 'आई' म्हणून हाक मारत आहे. नीतूनं आलियाकडं दुर्लक्ष केलं. 

विशेष म्हणजे याच व्हिडिओमधील एका व्हायरल क्लिपमध्ये रणबीरची चुलत बहीण करीना कपूर खान आलियाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी आलिया थोडं टेन्शनमध्ये दिसत होती. आता फॅन्स या दोन व्हिडिओंचा अर्थ लावून एकमेकांचा संदर्भ जोडत आहेत.

नीतू आणि आलियाच्या व्हायरल व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युझरनं दावा केलाय की, कौटुंबीक कार्यक्रमात सासूनं सुनेकडं दुर्लक्ष करणे ही नेहमीची गोष्ट आहे. तर एका फॅननं  आलीय भट्टसोबतही असंच होतं, असं मत व्यक्त करुन आश्चर्य व्यक्त केलंय. एका इंटरनेट युझरनं ही प्रत्येक घरातील गोष्ट आहे. त्यामध्ये काही मोठी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com