जया प्रदांच्या लेकाचा फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का, हिरोसारखी पर्सनॅलिटी पाहून म्हणाले: Welcome To Bollywood

ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांच्या लाडक्या लेकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची पर्सनॅलिटी आणि लुक पाहून चाहते हैराण झाले आहेत कारण यापूर्वी त्याची झलक कोणीही पाहिली नव्हती.

जाहिरात
Read Time: 2 mins
जया प्रदा आणि त्यांच्या मुलाचा फोटो व्हायरल

Jaya Prada Son: ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांनी बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला होता. जया यांनी त्यांच्या काळामध्ये मोठमोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केलीय. आता त्या सिनेमांमध्ये दिसत नसल्या तरीही सोशल मीडियावर सक्रिय असतात. जया प्रदा यांनी इन्स्टाग्रामवर मुलगा सम्राटसोबत फोटो शेअर केलाय. त्यांचा हा फोटो न्यूयॉर्कमधील आहे. जया प्रदा यांनी लेकासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. जया यांनी फिकट पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातलाय तर सम्राटने काळ्या रंगाचे टी-शर्ट घातल्याचे दिसतंय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जया प्रदा यांच्या लेकाचा फोटो व्हायरल (Jaya Prada Son Photo)

न्यूयॉर्क ब्रिजवर आई-लेकाने सुंदर-सुंदर फोटो काढले आहेत. फोटो शेअर करुन अभिनेत्रीने कॅप्शन दिलंय की, "Fun time at Newyork City with my son Samrat".  या पोस्टवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.  

(नक्की वाचा: Sharad Talwalkar Grandson: शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड, दिसतो एकदम हँडसम)

रिपोर्ट्सनुसार, सम्राट हा जया प्रदा यांच्या बहिणीचा मुलगा आहे, ज्याला त्यांनी दत्तक घेतलंय. सम्राट तमिळ भाषिक सिनेमांमध्ये काम करतो तसेच लवकरच सम्राट बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार आहे. 

Advertisement

(नक्की वाचा:सोनाली बेंद्रेचा को-स्टार ज्याने 31व्या वर्षात संपवलं आयुष्य, या अभिनेत्रीला झाली होती अटक; सुशांत सिंह राजपूतसारखे प्रकरण?)

जया प्रदा यांनी कोणाशी लग्न केले?

जया प्रदा यांनी 22 फेब्रुवारी 1986 रोजी निर्माते श्रीकांत नाहटा यांच्यासोबत लग्न केले. त्यांच्या करिअरबाबत सांगायचे झाल्यास जया यांनी बॉलिवूडसह तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, बंगाली आणि मराठी भाषिक सिनेमांमध्येही काम केलंय. 2023मध्ये हनीफ अडेनी यांनी दिग्दर्शित केलेल्या मल्याळम सिनेमा 'रामचंद्र बॉस अँड कंपनी'मध्येही त्या झळकल्या होत्या.