
Bollywood News: बॉलिवूडमधील काही कलाकारांचे असे रहस्यमय किस्से आहेत की जे ऐकून चाहत्यांना प्रचंड धक्का बसतो. काही सेलिब्रिटी अचानक गायब झाले ते पुन्हा कधी दिसलेच नाही तर काहींनी अतिशय लहान वयात आत्महत्या केली तर काहींचे अकाली निधन झाले. जगाचा निरोप घेतल्यानंतरही मीडिया आणि चाहत्यांमध्ये ते कायम चर्चेत असतात. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री जिया खान हे देखील असे कलाकार आहेत, ज्यांच्या अकाली मृत्यूमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अशाच एका कलाकाराने काही वर्षांपूर्वी अचानक एक्झिट घेतली होती. या अभिनेत्याने सोनाली बेंद्रेसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते आणि त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आपण चर्चा करतोय अभिनेता कुणाल सिंहबाबत, ज्याचा जन्म हरियाणातील कर्नल राजेंद्र सिंह यांच्या कुटुंबात झाला होता. कुणालने तमिळ भाषिक सिनेमांमध्ये प्रचंड नाव कमावलं होतं. कुणालने सोनाली बेंद्रेसोबत 'कधालर धिनम' या रोमँटिक सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. हा सिनेमा प्रचंड गाजला होता. हा सिनेमा हिंदी भाषेमध्ये पुन्हा चित्रित करण्यात आला, सिनेमाचे नाव 'दिल ही दिल में' असे ठेवण्यात आले. सिनेमातील 'ऐ नाज़नीन सुनो ना' हे गाणं आजही लोकप्रिय आहे.
यानंतर तमिळ सिनेमा 'पारवई ओनदरे पोथुमे और पुन्नागाई देसम'मध्येही कुणाल सिंह झळकला होता. पण सुपरहिट ठरल्यानंतर अभिनेत्याने सिनेमांमध्ये काम करणं बंद केले. कारण त्याच्या काही सिनेमांचे काम सुरू होते आणि काही सिनेमा तयार झाल्यानंतरही बॉक्सऑफिसवर झळकले नाहीत. जेव्हा कुणालला चांगल्या भूमिका मिळणं बंद झालं तेव्हा त्याने असिस्टंट एडिटर म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली तसेच सिनेमांची निर्मितीही करणं सुरू केले.
कुणालचे या अभिनेत्रीसोबत अफेअर होते?
खासगी आयुष्याबाबत सांगायचे झाले तर कुणाल सिंहने अनुराधासोबत लग्न केले, या दाम्पत्याच्या दोन मुली आहेत. काही रिपोर्ट्समधील दाव्यानुसार, दोघंही त्यांच्या संसारामध्ये खूश नव्हते. कुणाल सिंहचे अभिनेत्री लवीना भाटियासोबत नातेसंबंध असल्याचा अनुराधाला संशय होता. यामुळे अनुराधाने त्याला सोडले आणि आपल्या मुलींसह तिच्या आईवडिलांच्या घरी निघून गेली.
7 फेब्रुवारी 2008मध्ये कुणालला अभिनेत्री लवीना भाटियाने त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. योगी या हिंदी सिनेमावर काम करणाऱ्या या अभिनेत्याने निधनाच्या काही तासांपूर्वीच टीम आणि लवीनासोबत चर्चा केली होती, असे म्हटले जाते. कुणालच्या मृत्यूनंतर लवीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, कारण मृत्यूच्या वेळेस ती त्याच्यासोबत घरी होती.
(नक्की वाचा: Sri Sri Ravi Shankar Biopic: विक्रांत मेसी साकारणार श्री श्री रवि शंकर यांची भूमिका, या मुहूर्तावर सुरू होणार शुटिंग)
पोलिसांनी दिलेल्या जबाबामध्ये लवीना म्हटलं की, ती 10 मिनिटांसाठी बाथरुममध्ये होती आणि बाहेर आली तेव्हा तिने कुणालला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. लवीनाविरोधात कोणतेही पुरावे आढळले नाहीत, म्हणून पोलिसांनी तिला सोडून दिले. पोलिसांना या प्रकरणात काहीही चुकीचे आढळले नाही आणि म्हणून त्यांनी हे प्रकरण आत्महत्येचे मानले. पोलिसांच्या माहितीनुसार, कुणाल सिंह कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट खेळाडू होता. त्यामुळे तो स्वतःचं संरक्षण करण्यामध्ये सक्षम होता. इतकंच नव्हे तर अभिनेत्याने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
मुलीचा हत्या झाल्याचा वडिलांचा दावा
पण हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले जेव्हा त्याचे वडील कर्नल राजेंद्र सिंह यांनी कुणालचे मृत्यू प्रकरण संशयास्पद असल्याचा दावा केला. राजेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी कुणालचा मृतदेह हॉस्पिटलमधून आणला तेव्हा त्यावर जखमांचे व्रण होते. कुणालची आधी हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आत्महत्या केल्याचे भासवण्यात आल्याचा दावा राजेंद्र सिंह यांनी केला होता. कुणालच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, फ्लॅटमध्ये दुसरे कोणीतरी हजर असताना त्यांचा मुलगा आत्महत्या कशी करू शकतो? कुणालचे वडील राजेंद्र यांनी असेही म्हटले की, लवीना वॉशरूममध्ये किती वेळ घालवते हे कुणालला कसे कळले?
(नक्की वाचा: Prachi Pisat News: अभिनेत्रीला तो मेसेज पाठवणाऱ्या सुदेश म्हशीलकरचा नेटकऱ्यांकडून समाचार, 'बरं झालं खरं रूप...')
दरम्यान 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने कथित स्वरुपात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. मुंबईतील निवासस्थानी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी अभिनेत्री आणि त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती अटक करण्यात आली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world