Nora Fatehi Ratnagiri Video : कोकणामध्ये जाण्यासाठी तुम्ही ट्रेनने प्रवास करताय आणि त्याच ट्रेनमध्ये अभिनेत्री नोरा फतेही देखील आहे, असे म्हटलं तर तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण होईल ना? पण तुम्हाला माहितीय का... बोल्ड आणि ग्लॅमरस नोराने रत्नागिरी गाठण्यासाठी चक्क ट्रेनने प्रवास केला. हो अगदी खरं! तर झालं असं की, टीममधील एका सदस्याच्या लग्न समारंभासाठी नोराने दादर स्टेशनहून ट्रेनने थेट रत्नागिरी गाठले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोकण प्रवासाचा व्हिडीओ नोरा फतेहीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर देखील केलाय. रेल्वे स्टेशनपासून ते हळदीमध्ये डान्स करण्यापर्यंतचे सर्व क्षण तिने कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहेत. प्रवासासाठी नोराने काळ्या रंगाच्या कपड्यांची निवड केली होती. लोकांनी ओळखू नये, म्हणून तिने फेस मास्क देखील वापरले होते.
(नक्की वाचा: जब्या-शालूचे खरंच लग्न झालंय? सोमनाथने लग्नानंतरच्या पारंपरिक विधीचा VIDEO केला शेअर)
हळदी समारंभासाठी ट्रेनने पोहोचली नोरा फतेही
व्हिडीओ शेअर करताना नोराने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "अनुप सुर्वेच्या रत्नागिरीतील हळदी समारंभासाठीचा हा माझा छोटा व्लॉग आहे. त्याच्या हळदी समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही ट्रेनने प्रवास केला. हा अनुभव अतिशय सुंदर होता. पार्ट 2 वेडिंग व्लॉग पाहण्यासाठी Stay tuned"
कोण आहे अनुप सुर्वे?
अनुप सुर्वे मागील आठ वर्षांपासून नोरा फतेहीसोबत काम करत आहे. अनुपच्या इन्स्टाग्राम बायोनुसार तो एक क्रिएटिव्ह डायरेक्टर, फॅशन आणि कमर्शियल फोटोग्राफर-व्हिडीओग्राफर आहे. तसेच नोराने अनुपबाबत दिलेल्या माहितीनुसार, "ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी...अनुप गेल्या आठ वर्षांपासून माझ्या आयुष्यात आणि टीममध्ये आहे. 2017 पासून तो माझा प्रवास कॅमेऱ्यात कैद करत आहे. कॅमेऱ्यामागे राहणारा तो आता कॅमेऱ्यासमोर आहे. माझ्यासाठी कोणत्याही क्षणी उपलब्ध असणाऱ्या चांगल्या व्यक्तीच्या जीवनातील आनंदाचे क्षण आम्ही साजरे करत आहोत".
अनुप सुर्वेनंही त्यांच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये नोरा फतेही नवविवाहित दाम्पत्या शुभेच्छा देताना दिसत आहे. अनुपनेही नोराचे आभार व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. "व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगी माझ्या कुटुंबामध्ये सहभागी झालीस, त्यासाठी तुझे मनापासून कौतुक करतो", असे म्हणत अनुपने नोराला धन्यवाद म्हटले.
( नक्की वाचा : नीतू कपूरनं केलं आलिया भटकडे दुर्लक्ष, 'ती' आई म्हणून हाक मारत होती पण..Video Viral )