जाहिरात

क्रिकेटर शुभमन गिलची रुमर्ड गर्लफ्रेंड या मराठी सिनेमामध्ये झळकणार, कोण आहे ऑनस्क्रीन हीरो?

Premachi Gosht 2: नवाकोरा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

क्रिकेटर शुभमन गिलची रुमर्ड गर्लफ्रेंड या मराठी सिनेमामध्ये झळकणार, कोण आहे ऑनस्क्रीन हीरो?
"Premachi Gosht 2 Marathi Movie : सिनेमामध्ये नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार"
Premachi Gosht 2 Marathi Movie

Premachi Gosht 2: दिवाळीच्या मुहूर्तावर नवाकोरा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'प्रेमाची गोष्ट 2' हा रोमँटिक सिनेमा लवकरच बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि क्रिकेटर शुभमन गिलची रुमर्ड गर्लफ्रेंड पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. हिंदी मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोद्वारे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रिधिमा पंडित (Ridhima Pandit) या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. रिधिमा पंडित सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवरील तिचे पोस्ट्स आणि रील्स नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतात. त्यामुळे तिचं मराठी चित्रपटसृष्टीतील पदार्पण केवळ मराठी चाहत्यांसाठीच नाही, तर हिंदी आणि तरुण प्रेक्षकांसाठीही एक खास सरप्राइज ठरणार आहे.

रिधिमा आणि ललितच्या रोमँटिक गाण्याने घातलाय धुमाकूळ

नुकतंच प्रदर्शित झालेलं 'ये ना पुन्हा' हे रिधिमा आणि ललित प्रभाकरवर चित्रित झालेलं रोमॅण्टिक गाणं सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली असून चित्रपटाबद्दलचं कुतूहल अधिकच वाढत चाललं आहे.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Premachi Gosht 2 Marathi Movie

रिधिमा पंडित काय म्हणाली?

आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाविषयी रिधिमा म्हणाली,"हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे आणि पहिल्यांदाच मी मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसतेय. त्यामुळे उत्साह आणि थोडीशी धडधड अशा मिश्र भावना आहेत. सतीश राजवाडे सरांसोबत काम करणं माझ्यासाठी एक खास अनुभव ठरला. ललितसोबत काम करताना खूप मजा आली. तो अत्यंत उत्तम सहकलाकार आहे. एकूणच हा प्रवास माझ्यासाठी खूप स्पेशल आणि अविस्मरणीय ठरला असून प्रेक्षक माझ्या या नव्या प्रवासाला नक्कीच प्रेम देतील, अशी मला खात्री आहे.”

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Premachi Gosht 2 Marathi Movie

'प्रेमाची गोष्ट 2' सिनेमा कधी होणा रिलीज?

या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले आहे. निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली आहेत. 21 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

(नक्की वाचा: Entertainment News: जटा, शरीरावर भस्म, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा... बड्या दिग्दर्शकाची का झाली अशी अवस्था?)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Premachi Gosht 2 Marathi Movie

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com