जाहिरात

Rimi Sen : अक्षयकुमारच्या अभिनेत्रीनं कार कंपनीच्या विरोधात केला 50 कोटींचा दावा, म्हणाली....

Rimi Sen : अभिनेत्री रिमी सेननं तिच्या कारमध्ये कथितपणे येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे कार कंपनी लँड रोव्हरच्या विरोधात 50 कोटींची याचिका दाखल केली आहे.

Rimi Sen : अक्षयकुमारच्या अभिनेत्रीनं कार कंपनीच्या विरोधात केला 50 कोटींचा दावा, म्हणाली....
मुंबई:

Rimi Sen : अभिनेत्री रिमी सेननं तिच्या कारमध्ये कथितपणे येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे कार कंपनी लँड रोव्हरच्या विरोधात 50 कोटींची याचिका दाखल केली आहे. रिमीनं 2020 साली 92 लाखांमध्ये ही कार विकत केली होती. रिमीनं या तक्रारीमध्ये लँड रोव्हर कारच्या दुरुस्तीसंबंधात मानसिक छळ झाल्याचाही आरोप केला आहे. रिमीच्या या कारची वॉरंटी जानेवारी 2023 पर्यंत होती. पण, कोरोना काळात लॉकडाऊनमुळे या कारचा फार वापर झाला नव्हता. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रिमीनं लॉकडाऊननंतर या कारचा अधिक वापर सुरु केला. त्यानंतर तिला कथितपणे कारमधील खराब गोष्टी समजल्या. या कारमध्ये सनरुफ, साऊंड सिस्टम आणि रियर-एंड-कॅमेरासंबंधात अनेक अडचणी आहेत. रियर अँड कॅमेरा खराब असल्यानं 25 ऑगस्ट 2022 रोजी कारची खांबाला धडक बसली, असा दावा रिमीनं तिच्या तक्रारीमध्ये केला आहे. याबाबत तिनं डिलरलाही माहिती दिली होती. पण, डिलरनं कॅमेरा नीट करण्याच्या ऐवजी तिच्याकडून तो कॅमेरा खराब असल्याचे पुरावे मागितले. ही अडचण दूर केल्यानंतर कारमधील अन्य तांत्रिक अडचणी उघड झाल्या. 

या कारची निर्मिती तसंच त्यानंतर डिलरकडून झालेल्या देखभालीमध्ये कमतरता होती. ही कार डिफेक्टिव्ह होती, असा दावा रिमीनं कायदेशीर नोटीशीमध्ये केला आहे. कारची दहापेक्षा जास्त वेळा दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतरही ती व्यवस्थित झाली नाही. त्याचा तिला मानसिक त्रास झाला असून त्यामुळे बरीच गैरसोय सहन करावी लागली असल्याचं रिमी सेननं म्हंटलं आहे. 

( नक्की वाचा : IC 814 Hijack : प्रवाशांसोबत अंताक्षरी ते दहशतवाद्याकडून माफी, अनुभव सिन्हाच्या वेब सीरिजमध्ये काय आहे? )
 

खराब कारच्या बदली नवी कार

रिमी सेननं तिला झालेल्या मानसिक छळाबद्दल 50 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर कायदेशीर खर्चासाठी अतिरिक्त 10 लाख रुपये देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर तिनं खराब कारच्या बदल्यात नवी कार देण्याचीही मागणी केली आहे. 

रिमी सेनची चित्रपट कारकीर्द

रिमी सेननं 2002 साली 'नी थोडू कावली' या चित्रपटातून पदार्पण केलं. तिला खरी ओळख 2003 साली प्रदर्शित झालेल्या 'हंगामा' या हिंदी चित्रपटातून मिळाली. त्यानंतर तिनं धूम', 'गरम मसाला', 'गोलमाल', 'बागबान', 'दीवाने हुए पागल', 'फिर हेरा फेरी' और 'जॉनी गद्दार', 'दे ताली', 'संकट सिटी', 'हॉर्न ओके प्लीज', 'थँक यू' आणि 'शागिर्द या बड्या चित्रपटांमध्ये काम केलं. रिमीनं 'बिग बॉस सिझन-9' आणि 'झलक दिखला जा' या कार्यक्रमातही भाग घेतला होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
‘वीर मुरारबाजी'च्या रुपाने पुरंदरच्या वेढ्याचा इतिहास रुपेरी पडद्यावर, शिवरायांची भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता
Rimi Sen : अक्षयकुमारच्या अभिनेत्रीनं कार कंपनीच्या विरोधात केला 50 कोटींचा दावा, म्हणाली....
Salman Khan struggle to getting up from seat in latest video viral
Next Article
सलमान खानचा VIDEO व्हायरल, आपल्या हिरोची अवस्था पाहून फॅन्स चिंतीत