- अभिनेत्री त्रिशा कृष्णनने थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात खास पारंपरिक लुकसह उपस्थिती दर्शवली होती
- त्रिशाने शपथविधी सोहळ्याच्या फोटोसोबत सोशल मीडियावर प्रेमाचा उल्लेख करणारा कॅप्शन देऊन आपले आभारही मानले आहेत
- चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये विजय यांच्या शपथविधी सोहळा पार पडला
Trisha Krishnan Photos: अभिनेत्री त्रिशा कृष्णने सुपरस्टार थलपती विजयच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थिती दर्शवली होती. शपथविधी सोहळ्याला तिने खास लुक कॅरी केला होता, तिच्या या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्रिशाने थलपती विजयच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावल्याने त्यांच्या अफेअरच्या चर्चांना अधिकच उधाण आले. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर त्रिशा कृष्णनने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट शेअर केली आहे. शपथविधी सोहळ्याचा खास लुकचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत, विशेष म्हणजे तिने या पोस्टला प्रेमाशी संबंधित सुंदर कॅप्शनही दिलंय. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये रविवारी (10 मे) अभिनेते विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
त्रिशा कृष्णनची पहिली पोस्ट
त्रिशा कृष्णनने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातील लुकच्या फोटोंचा समावेश आहे. या सोहळ्यासाठी त्रिशाने 'सीफोम ग्रीन' रंगाची साडी आणि सोनेरी रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. तसेच अंबाडा हेअर स्टाइल करून त्यावर गजरा माळला होता. अभिनेत्रीच्या या पारंपरिक लुकने चाहत्यांची मने जिंकली. तिने या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, "प्रेम कायमच प्रभावी असते. माझ्यासोबत नेहमीच असणाऱ्या माझ्या आवडत्या लोकांचे आभार." या पोस्टमध्ये तिने आपल्या स्टाइल आणि मेकअप टीमचेही आभार मानले आहेत.
(नक्की वाचा : Thalapathy Vijay Son: थलपती विजय यांच्या मुलाचे 5 फोटो, वडिलांची आहे कार्बन कॉपी; या भूमिकेत गाजवणार सिनेसृष्टी?)
चाहते म्हणाले थलायवी
त्रिशाच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइकचा मोठ्या प्रमाणात पाऊस पाडला आहे. चाहते कमेंट बॉक्समध्ये थलायवी, सुंदर असे शब्द लिहून त्रिशाच्या लुकचे कौतुक करत आहेत.
त्रिशाने विजय यांच्या कुटुंबीयांची भेट घेतलीचेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडिअममध्ये विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्यास विजय यांचे आई-वडील देखील उपस्थित होते. आपला मुलगा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्याचे पाहून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शक एस. ए. चंद्रशेखर यांनी दिली. इतकेच नाही तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये त्रिशा विजयच्या कुटुंबाची भेट घेताना दिसत आहे.
विजय आणि त्रिशा यांच्याबाबत चर्चा
थलपती विजय आणि त्रिशा कृष्णन ही तमिळ सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय 'ऑनस्क्रीन जोडी' आहे. या दोघांनी घिल्ली, थिरुपाची, आथी, कुरुवी आणि लिओ यासारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया त्रिशाल आणि विजयचे नाव जोडले जात आहे. पण दोघांनीही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विजयच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान अभिनेता त्रिशासोबत एका लग्नात दिसल्याने त्यांच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान विजयची पत्नी संगीतानेही पतीवर अफेअरचे आरोप केल्याचे म्हटले जात होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world