जाहिरात

Keerthana: कोण आहे कीर्तना? 29 व्या वर्षीच बनली तामिळनाडूची मंत्री, 70 वर्षांचा रेकॉर्ड ही मोडला, हिंदीत ही...

मुख्यमंत्री विजय यांच्या नऊ मंत्र्यांच्या टीममध्ये त्यांचा समावेश असून, पक्ष विस्तारासाठी त्या महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Keerthana: कोण आहे कीर्तना? 29 व्या वर्षीच बनली तामिळनाडूची मंत्री, 70 वर्षांचा रेकॉर्ड ही मोडला, हिंदीत ही...
  • एस. कीर्तना ही तमिळनाडूमध्ये सर्वात तरुण मंत्री झाली आहे
  • शिवकाशी विधानसभा मतदारसंघातून कीर्तना यांनी 70 वर्षांनंतर पहिल्या महिला आमदार म्हणून विजय मिळवला
  • तमिळनाडूमध्ये हिंदी विरोधाच्या वातावरणातही कीर्तना प्रभावीपणे हिंदी भाषेत संवाद साधतात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Tamil Nadu Minister Keerthana Profile: तमिळनाडूच्या राजकारणात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा आहे. ते नाव म्हणजे एस. कीर्तना. 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाचे प्रमुख थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच, त्यांच्या मंत्रिमंडळात अवघ्या 29 वर्षांच्या कीर्तना यांनी स्थान मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तमिळनाडूच्या इतिहासात सर्वात तरुण वयात मंत्री होण्याचा मान मिळवत त्यांनी एक नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे कीर्तना यांचा अतिशय सुंदर हिंदी बोलता येते. त्यांच्या हिंदीसाठी त्यांना खास ओळखलं जातं. 

शिवकाशीत 70 वर्षांनंतर महिला आमदाराचा विजय
कीर्तना यांनी फटाक्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवकाशी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांनी 11,000 पेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला. विशेष म्हणजे, गेल्या 70 वर्षांपासून या मतदारसंघावर पुरुषांचे वर्चस्व होते. कीर्तना यांनी हे वर्चस्व मोडीत काढत शिवकाशीच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळवला. हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. त्या बालेकिल्ल्याला त्यांनी सुरूंग लावला आहे. 

नक्की वाचा - Vijay Oath Ceremony: विजय यांना शपथविधीवेळी भर मंचावर राज्यपालांनी टोकले, शपथ घेताना नक्की काय घडले?

हिंदी विरोधाच्या राज्यात 'फर्राटेदार' हिंदी
तमिळनाडूमध्ये अनेकदा हिंदी भाषेला विरोध होताना दिसतो. मात्र, कीर्तना संपत यांची ओळख अनेक भाषा जाणणारी एक सुशिक्षित नेत्या म्हणून आहे. त्या अत्यंत प्रभावीपणे हिंदी बोलतात. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांचे हिंदीतील अनेक इंटरव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पक्षाची विचारधारा राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी हिंदी भाषा महत्त्वाची असल्याचे त्यांचे मत आहे. आपला पक्ष काय आहे आणि तो काय करणार आहे हे देशाला हिंदीतून समजवून सांगू असं ही त्या सांगत आहेत. त्या आता तामिळनाडूच्या सर्वात तरूण मंत्री ही ठरल्या आहेत. 

नक्की वाचा - Tamil Nadu CM oath ceremony: तमिळनाडूत 'विजय'राज! थलपतीने घेतली CM पदाची शपथ; आई- वडिलांच्या डोळ्यात अश्रु

राजकीय अनुभवाची शिदोरी
राजकारणात येण्यापूर्वी कीर्तना यांनी राजकीय सल्लागार (Political Consultant) म्हणून काम केले आहे. त्यांनी पदव्युत्तर (PG) शिक्षण पूर्ण केले असून, यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसोबत कामाचा अनुभव घेतला आहे. आता मुख्यमंत्री विजय यांच्या कोअर टीममधील एक विश्वासू सहकारी म्हणून त्या राज्याची धुरा सांभाळतील. 70 वर्षांचा पुरुषी वर्चस्वाचा इतिहास मोडीत काढणाऱ्या कीर्तना आता तमिळ राजकारणातील नवा चेहरा ठरत आहेत. मुख्यमंत्री विजय यांच्या नऊ मंत्र्यांच्या टीममध्ये त्यांचा समावेश असून, पक्ष विस्तारासाठी त्या महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com