हैद्राबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिला अनियंत्रित गर्दीचा सामना करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये समांथा आपल्या कारपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री निधी अग्रवाल हिच्यासोबतच असाच प्रसंग घडला होता. निधी तिचा आगामी चित्रपट 'द राजा साब' या गाण्याच्या लॉन्च कार्यक्रमात सामील झाली होती. जिथं गर्दीने तिला घेराव घातला. त्यानंतर समांथासोबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे.
गर्दीने घेराव घातला...
व्हायरल व्हिडिओमध्ये समांथाने सोनेरी रंगाची साडी नेसली आहे. तिच्यासोबत सुरक्षा रक्षकही उपस्थित आहे. तो तिला कारपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र तरीही गर्दीने तिला घेराव घातला होता, त्यामुळे पुढे जाण्यासाठी तिला अडचणीचा सामना करावा लागत होता. ही घटना हैद्राबादच्या एका स्टोअरच्या उद्घाटनाच्या वेळी घडली.
Why fans in south don't understand boundaries even after rajasaab incident
byu/Hungry_Business592 inBollyBlindsNGossip
या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या मानसिकतेचा तीव्र निषेध केला आहे. काहींनी आयोजकांना धारेवर धरलं आहे, त्यांनी अशा कार्यक्रमांना सेलिब्रिटींना बोलावण्यापूर्वी त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं. महिला कलाकारांसोबत घडणाऱ्या या घटनांवर चिंता व्यक्त केली जात आहे आणि सुरक्षेची मागणी केली आहे.