जाहिरात

Saiyaara IMDb Rating : शाहरुख खानच्या 'जवान'वर अहान पांडेचा 'सैय्यारा' पडला भारी, IMDb रेटिंग पाहून हैराण व्हाल!

सैय्याराच्या आयएमडीबी रेटिंगबद्दल बरीच चर्चा आहे. एवढंच नाही तर या चित्रपटाच्या आयएमडीबी रेटिंगची तुलना शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर 'जवान'शी केली जात आहे.

Saiyaara IMDb Rating : शाहरुख खानच्या 'जवान'वर अहान पांडेचा 'सैय्यारा' पडला भारी, IMDb रेटिंग पाहून हैराण व्हाल!
'सैयारा' विरुद्ध 'जवान': IMDb रेटिंगमध्ये कोण पुढे?
नवी दिल्ली:

Saiyaara IMDb Rating : बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून देणारा अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचा पहिला चित्रपट 'सैय्यारा' सध्या चर्चेत आहे. प्रेक्षक विविध प्रकारे या चित्रपटाचं कौतुक करीत आहे. सैय्याराची IMDb रेटिंगदेखील सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाची IMDb रेटिंगची तुलना शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर जवानशी होत आहे. मोहित सुरी दिग्दर्शित 'सैय्यारा' 18 जुलै 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तर जवान 2023 मधील सर्वात मोठ्या अॅक्शन चित्रपटांपैकी एक होता. दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली, मात्र IMDb रेटिंगमध्ये कोणत्या चित्रपटाने मारली बाजी? 

सैय्यारामध्ये अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या जोडीने रोमँटिक ड्रामाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भावुक केलं. थिएटरमध्ये अनेक मुल-मुली चित्रपट पाहिल्यानंतर ओक्साबोक्शी रडताना दिसले. या चित्रपटाला IMDb वर 7.1 ची रेटिंग मिळाली आहे. ही रेटिंग मोहित सुरीचा मागचा हिट चित्रपट आशिकी 2 (7.1) इतकी आहे. चित्रपटाची पटकथा, संगीत आणि अहान-अनीता यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली आहे. सैय्याराने पहिल्या चार दिवसात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आणि बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड तोडले. 

पिंपल्स घालवण्यासाठी तमन्नाचा किळसवाणा उपाय, ऐकून तुम्हीही म्हणाल ईssss!

नक्की वाचा - पिंपल्स घालवण्यासाठी तमन्नाचा किळसवाणा उपाय, ऐकून तुम्हीही म्हणाल ईssss!

दुसरीकडे जवानमध्ये शाहरुख खानची जबरदस्त अॅक्शन आणि देशभक्तीपर कहाणी चाहत्यांच्या पसंतीत उतरली. IMDb वर जवानला 6.9 रेटिंग मिळाली होती. जवान हा त्या कालावधीतील हिट चित्रपट होता. या चित्रपटाने भारतात 600 कोटींहून अधिक कमाई केली होती. मात्र IMDb रेटिंगमध्ये सैय्याराने जवानला मागे सोडलं आहे. 

सैय्याराच्या यशाने हे सिद्ध केले की, नवीन प्रतिभादेखील  दिग्गजांना मागे टाकू शकतात. पण 'जवान'चा अ‍ॅक्शन आणि शाहरुखचा स्टारडम अजूनही अतुलनीय आहे. दोन्ही चित्रपट त्यांच्या स्वतःच्या शैलीत अद्वितीय आहेत, परंतु आयएमडीबी रेटिंगमध्ये 'सैयारा' अजूनही वरचढ आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com