Aishwarya Rai Video: ऐश्वर्या राय वयाच्या 80व्या वर्षी दिसेल अशी! चेहऱ्यावर सुरकुत्या तरीही म्हणाल सुंदरी

Aishwarya Rai Bachchan AI Video: बॉलिवूड अभिनेत्री आणि विश्व सुंदरी ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे कौतुक करताना शब्द अपुरे पडतात. पण वयाच्या 80व्या वर्षी ऐश्वर्या कशी दिसेल? हे तुम्हाला पाहायचंय का... 

जाहिरात
Read Time: 2 mins

Aishwarya Rai Bachchan AI Video: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI हे एक असे टुल उपलब्ध झाले आहे, ज्यामुळे युजर्स जवळपास सर्व काही करू शकतात. कोणतेही फोटो काढुन AIच्या मदतीने ते फोटो तुम्हाला हवे त्या पद्धतीने एडिट करू शकता. उदाहरणार्थ लहान मुलांचे फोटो एडिट करून त्यांना तरुण लुक देऊ शकता, तरुणांना वृद्ध बनवू शकता आणि वृद्धांना तरुणही बनवू शकता. यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचाही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये AIच्या मदतीने ऐश्वर्या राय 80 वर्षांची झाल्यावर कशी दिसेल? बालपणी ती कशी दिसत असेल? याचे चित्र दाखवण्यात आले आहे.  

(नक्की वाचा: 'तो आमच्यासमोर पँट काढत असे,' अभिनेत्रीनं सांगितली शाळेतील धक्कादायक घटना)

ऐश्वर्या रायचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

ऐश्वर्या राय-बच्चन या नावाचा उल्लेख होताच, तिचे रुप-सौंदर्य, बोलण-हसणे डोळ्यांसमोर उभे राहते. सौंदर्याच्या या राणीने बॉलिवूडसह टॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रेक्षकांनाही वेड लावले होते. पण ही नॅचरल ब्युटी म्हातारपणी कशी दिसेल? याबाबत कोणीही कल्पना केली नसावी. ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या तर चाहत्यांना मोठा धक्काच बसेल. मिस वर्ल्ड 80 वर्षांची झाल्यानंतर कशी दिसेल? याची कल्पना करा. तुम्हाला कल्पना करावी वाटत नसेल तरीही AIने तिचा व्हिडीओ तयार केला आहे. ऐश्वर्या रायचे काही फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत, जे AIद्वारे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ऐश्वर्याच्या 80व्या वर्षातील लुकसह बालपणाचाही फोटो दिसत आहे. 

Advertisement

(नक्की वाचा: 'द लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमाला मनसेचा विरोध, राज ठाकरेंचा ट्वीट करत इशारा)

(नक्की वाचा: 90 किमी सायकलिंग, 21 किमी रनिंग, 1.9 किमी पोहणे! बॉलिवूड अभिनेत्रीनं केलं सर्वांनाच थक्क)

ऐश्वर्या रायच्या व्हिडीओवर कमेंट्स पाऊस

इन्स्टाग्रामवर active.suresh या नावाच्या पेजवर ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याचे वेगवेगळ्या वयातील लुक पाहायला मिळत आहेत. 80 वर्षांच्या ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत आहे. तिचा हा फोटो 'जोधा-अकबर' सिनेमातील आहे. ऐश्वर्याच्या बालपणासह विशीतील, तिशीतील, पन्नाशीतील, साठीमधील आणि वयाच्या 80व्या वर्षात ऐश्वर्या कशी दिसेल, याची झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओ युजर्सकडून कमेंट्सचा पाऊस पाडण्यात येत आहे. ऐश्वर्या 'जया बच्चनसारखी दिसतेय',अशा कमेंट्सही युजर्संनी केल्या आहेत.   

Advertisement

Photo Credit: Suresh M Solanki Instagram