जाहिरात
This Article is From Sep 21, 2024

'तो आमच्यासमोर पँट काढत असे,' अभिनेत्रीनं सांगितली शाळेतील धक्कादायक घटना

Anita Hassanandani :अनितानं एका मुलाखतीमध्ये तिच्या शालेय आयुष्यातील एक धक्कादायक घटना सांगितली आहे.

'तो आमच्यासमोर पँट काढत असे,' अभिनेत्रीनं सांगितली शाळेतील धक्कादायक घटना
मुंबई:

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये अनिता हसनंदानीचा समावेश होतो. वयाच्या 17 व्या वर्षी इधर-उधर या मालिकेतून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणाऱ्या अनितानं अनेक लोकप्रिय हिंदी मालिकात काम केलंय. त्याचबरोबर हिंदी तसंच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तिनं अभिनय केला आहे. अनिता सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिच्या आयुष्यातील अपडेट्स ती फॅन्ससोबत नेहमी शेअर करते. अनितानं एका मुलाखतीमध्ये तिच्या शालेय आयुष्यातील एक धक्कादायक घटना सांगितली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शालेय आयुष्यातील धक्कादायक घटना

अनितानं Hauterrfly ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शालेय आयुष्यातील एका धक्कादायक घटनेचा गौप्यस्फोट केला आहे. या मुलाखतीमध्ये अनिता म्हणाली, 'आम्ही तेव्हा शाळेत होतो. आम्हाला आई शाळेत जाण्यासाठी रिक्षाचे 10 रुपये देत असे. शाळेतून घरी आम्ही चालत येत असू. आम्ही ते पैसे कँटिनमध्ये सामोसा किंवा अन्य पदार्थ खाण्यासाठी बचत करत होतो. आम्ही चालत येताना त्या रस्त्यावर एक रिक्षावाला होता. तो नेहमी तिथं दिसत असे.

तो रिक्षावाला त्याच ठिकाणी उभा राहत असे. तो पँट काढून आमच्याकडं अतिशय घाण नजरेनं पाहायचा. तो स्वत:च्या शरिरासोबत चाळेही करत असे. त्याच्या भितीनं आम्ही रस्ता बदलला. पण त्यानंतरही तो पाठलाग करत असेल का? अशी भीती आम्हाला वाटत असे. त्याला रस्ता माहिती होता. तसंच त्याच्याकडं रिक्षा होता  त्यामुळे तो आमच्या मागे येतोय, अशी भीती वाटत असे. इतकंच नाही तर शाळेजवळ रिक्षा दिसली तरी आम्हाला अंगावर काटा येत असे,' असं अनितानं सांगितलं. 

( नक्की वाचा : 'खोसला का घोसला' मधील मुख्य अभिनेता कार अपघातामध्ये गंभीर जखमी, ICU मध्ये दाखल )
 

'ये है मोहब्बते' या मालिकेतील अनिताची भूमिका चांगलीच गाजली होती. अनितानं आई झाल्यानंतर पाच वर्ष कामातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर सुमन इंदौरीच्या टीव्ही शोमधून तिनं कमबॅक केलं आहे. या शोमध्ये श्वेता गौतम, जैन इमाम, अशनूर कौर यांची प्रमुख भूमिका आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: