ऐश्वर्या रायचा पहिला VIDEO VIRAL, जेव्हा मिस वर्ल्डचा किताब जिंकून आली भारतात; साधेपणावर व्हाल फिदा

1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्या राय मायदेशी परतली होती तेव्हा तिच्या साधेपणाने चाहत्यांची मने जिंकली. ऐश्वर्याचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"मिस वर्ल्ड किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्या रायचे असे झाले होते स्वागत"

Aishwarya Rai Bachchan Viral Video: अभिनेत्री ऐश्वर्या रायने 1994मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. इतक्या वर्षांनंतरही ऐश्वर्या तितकीच सुंदर दिसते. पण एक काळ असा होता की प्रत्येकालाच तिच्या सौंदर्याने अक्षरशः वेड लावले होते. निळ्या रंगाचे डोळे आणि सुंदर हास्यने तिने प्रत्येकाच्या मनावर राज्य केले होते. ब्युटी विथ ब्रेन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्याने या सौंदर्याच्या राणीमुळे बऱ्याच काळानंतर मिस वर्ल्डचा (Miss World 1994) ताज भारतात आला होता. हा किताब जिंकून ऐश्वर्या (Aishwarya Rai) जेव्हा भारतात आली तेव्हा तिचा अनोखा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला होता. त्यावेळेसचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ऐश्वर्याचे स्वागत करण्यासाठी लोकांनी अक्षरशः गर्दी केल्याचे दिसत आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

देसी लुकमध्ये घरवापसी

ऐश्वर्या रायने मोरपंखी रंगाचा ड्रेस घालून मायदेशी परतली होती. लहरे टीव्हीने ऐश्वर्या रायचा हा जुना व्हिडीओ शेअर केलाय. 1994 सालचा हा व्हिडीओ आहे. विमानतळावर पोहोचल्यानंतर ऐश्वर्या रायचा साधा पण सुंदर लुक चाहत्यांना पाहायला मिळाला. मिडल पार्टेड हेअर स्टाइल, कपाळावर टिकली, आर्टिस्टिक नेकलेस असा लुक ऐश्वर्याने कॅरी केला होता.  

(नक्की वाचा: माधुरी दीक्षितच्या गाण्यावर तरुणींनी धबधब्याखाली केला डान्स, VIDEO पाहून विसराल अभिनेत्रीचा डान्स)

चाहत्यांची गर्दी  

ऐश्वर्या रायची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी विमानतळावर प्रचंड गर्दी केली होती. काही जण ऐश्वर्या रायकडून ऑटोग्राफ घेत आहेत तर काही लोकांना तिला प्रत्यक्षात पाहून सुखद धक्का बसला होता. ऐश्वर्या राय देखील चाहत्यांना योग्य पद्धतीने प्रतिसाद देत होती. या सुंदर व्हिडीओला इंस्टाग्रामवर 67 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पाहून चाहते ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Advertisement

(नक्की वाचा: स्वतःच्याच लग्नात नववधूचा काजोलच्या गाण्यावर धमाकेदार डान्स! पाहणाऱ्यांच्या अंगावर आले शहारे, लग्नच विसरले)